• Download App
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Navi Mumbai International Airport

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विशेष प्रतिनिधी 

    ठाणे  : सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज वाशी, नवी मुंबई येथे काढले. Navi Mumbai International Airport

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

    त्यानंतर सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या 26 हजार 502 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ, महाराष्ट्र भवन, नैना नगर रचना परियोजना 8 ते 12 मधील पायाभूत सुविधा विकास कामे, ठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन 3 हजार 833 सदनिका), पश्चिम परिघीय (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) मार्ग यांचे भूमिपूजन; 18 होल्सच्या आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स व सेंटर ऑफ एक्सलन्स येथील दर्शक गॅलरी यांचे उद्घाटन आणि ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.


    महायुती सरकारचे विक्रमी 80 निर्णय; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 वरून 15 लाख, पत्रकारांसाठी महामंडळाची घोषणा


    या प्रसंगी श्री.संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको, श्री. श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, मावळ, श्री. नरेश म्हस्के, लोकसभा सदस्य, ठाणे, श्री. निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानपरिषद सदस्य, श्री.गणेश नाईक, विधानसभा सदस्य, ऐरोली, श्री. प्रशांत ठाकूर, विधानसभा सदस्य, पनवेल, श्रीमती मंदा म्हात्रे, विधानसभा सदस्य, बेलापूर, श्री. महेश बालदी, विधासभा सदस्य, उरण, श्री. विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको श्री. गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी विमानांच्या यशस्वी लॅंडिंग व फ्लायपास्टकरिता सिडको व अन्य संबंधितांचे अभिनंदन केले. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची व महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून सिडकोने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

    याप्रसंगी ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी सिडकोमध्ये कंत्राटी स्वरूपावर नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच सिडकोच्या विविध प्रकल्पांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले.

    Navi Mumbai International Airport

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस