राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अन्वेषण या संशोधन विषयक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे-राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अन्वेषण या संशोधन विषयक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. आरोग्यशास्त्र व संबंधित विषय तसेच औषधनिर्माणशास्त्र व पोषण या या गटात विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.National level research competition pune University students get prize
भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली आणि अकॅडमी ऑफ मेरिटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग अभिमत विद्यापीठ चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० व ११ मार्च २०२२ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यापीठातील गार्गी निकम, अमेय गावसकर, फैयाज मुजावर यांच्या गटाला प्रथम क्रमांकाचे पहिल्या क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. हॅलोबेटिक या प्रकल्पाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी डायबेटिक जखमेसाठी एक नाविन्यपूर्ण ड्रेसिंग प्रकार साकारला आहे. या विद्यार्थ्यांना एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील प्राध्यापक डॉ. राहुल पाडळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्न एआयएसएसएमएस इंजिनिअरिंग महाविद्यालयात फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी या महाविद्यालयाने पारितोषिक पटकावले आहे.
National level research competition pune University students get prize
महत्त्वाच्या बातम्या
- आत्महत्या करण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार
- शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्याचे अमिषाने चार काेटींची फसवणुक
- गुणरत्न सदावर्तेंसाठी सरकारने मागितली 14 दिवसांची पोलीस कोठडी; किल्ला कोर्टाने दिली 2 दिवसांची पोलिस कोठडी!!
- सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण पाेलीसांची गुप्तचर यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येते – अजित पवार