• Download App
    राष्ट्रवादी कॉग्रेसकडून राज ठाकरे यांचे ‘प्रबोधन’ प्रबोधनकार ठाकरे ;महात्मा फुले यांच्या पुस्तकांचा संच पाठविला भेटNational Congress party members gifted books to the Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare

    राष्ट्रवादी कॉग्रेसकडून राज ठाकरे यांचे ‘प्रबोधन’ प्रबोधनकार ठाकरे ;महात्मा फुले यांच्या पुस्तकांचा संच पाठविला भेट

    मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली. त्यांना महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि सौहार्द समजावे यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरविले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत इतिहास माहिती नसताना बेलगाम वक्तव्ये केली. त्यांना महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि सौहार्द समजावे यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांचे प्रबोधन करण्याचे ठरविले आहे. यासाठी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, शरद पवार आणि गोविंद पानसरे यांची पुस्तके भेट म्हणून पाठविण्यात आली. National Congress party members gifted books to the Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare

    राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सिटी पोस्ट येथून टपालाद्वारे पुस्तकांचा संच राज ठाकरे यांना पाठविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे,अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते, रोहन पायगुडे, मंगेश मोरे, आनंद सागरे, गजानन लोंढे,निलेश वाघमारे, देवा व्हाल्लेकरआदी उपस्थित होते.

    याबाबतची भूमिका मांडताना देशमुख म्हणाले, राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाची पुरेशी माहिती नाही असे त्यांच्या ठाण्यातील भाषणातून दिसून आले. वा प्रबोधकार ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या नेत्याचा इतिहास इतका कच्चा असू शकतो हे पुन्हा कळाले. आपल्याच ज्ञाती बांधवांचं जागरण करावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्यालाही दूर लोटावं, या पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ हे पत्र चालवलं.

    मात्र, राज ठाकरे ते विसरून धर्मांध पक्षांच्या नादी लागून महाराष्ट्राच्या सौहार्दाच्या संस्कृतीवर हल्ला करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या विचारांचा वारसा तरी राज ठाकरे यांना चालवावा यासाठी त्यांच्या ज्ञानवर्धनाकरिता समग्र प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले यांचे ‘गुलामगिरी’, गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?‘ आणि शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ तसेच गुजराथ फाईल्स ही पुस्तके पाठविली आहेत.

    National Congress party members gifted books to the Maharashtra Navanirman Sena leader Raj Thakare

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!