• Download App
    National Commission for Women Chairperson Vijayatai Rahatkar visits Nashik; reviews police investigation into TCS corporate jihad and Kharat cases!! राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिक दौरा; TCS कॉर्पोरेट जिहाद आणि खरात प्रकरणांच्या पोलीस तपासाचा घेतला आढावा!!

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिक दौरा; TCS कॉर्पोरेट जिहाद आणि खरात प्रकरणांच्या पोलीस तपासाचा घेतला आढावा!!

    vijaya rahatkar

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई राहटकर यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात TCS कॉर्पोरेट जिहाद आणि अशोक खरात प्रकरणांसंदर्भात पोलीस तपासाचा आढावा घेतला. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांसमवेत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात विशेष बैठक आयोजित केली. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला हजर होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विजयाताई रहाटकर यांना दोन्ही प्रकरणांच्या चौकशी आणि तपासाची सविस्तर माहिती दिली. विजयाताई रहाटकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना परिणामकारक चौकशी, तपास आणि कारवाई संदर्भात निर्देश दिले.National Commission for Women Chairperson Vijayatai Rahatkar visits Nashik; reviews police investigation into TCS corporate jihad and Kharat cases!!

    राष्ट्रीय महिला आयोगाने TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची आधीच गंभीर दखल घेऊन एक तथ्य शोध समिती नाशिक मध्ये पाठविली होती. या समितीच्या सदस्यांनी कॉर्पोरेट जिहाद मधील पीडित महिला आणि पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन, त्याच बरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या संदर्भातला अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर केला होता.



     

    या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांची नाशिक भेट विशेष महत्त्वाची मानली होती. आहे. कारण त्यांच्या या भेटीतून TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातल्या पीडितांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला वेग मिळाला.

    या खेरीज विजयाताई रहाटकर काळाराम मंदिरात धर्मध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या.‌ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काळाराम मंदिरावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या गोदावरी महाआरतीच्या कार्यक्रमात देखील सहभागी झाल्या.

    National Commission for Women Chairperson Vijayatai Rahatkar visits Nashik; reviews police investigation into TCS corporate jihad and Kharat cases!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली