विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे खेळ रंगवताना पप्पू कलानी यांच्या उल्हासनगरने पहिला नंबर लावला, तर दुसरा नंबर नाशिकचा लागला आहे. पप्पू कलानी गटाच्या 22 नगरसेवकांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला तर नाशिक मध्ये बाहेरून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या सुरुवातीला वाढलेली दिसते आहे. Nashik’s number after Ulhasnagar; Game of change in the face of municipal elections
महाराष्ट्रात फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिका निवडणुका अपेक्षित आहेत. त्यातही नगरसेवकांची संख्या वाढल्याने महापालिका आणि नगर परिषदांच्या परिक्षेत्रात पक्षांतराच्या लाटांवर लाटा अपेक्षित आहेत.
सध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. मात्र, कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 122 वरून थेट 133 वर नेण्यात आली आहे. नगरसेवकांची संख्या वाढचा राजकीय परिणाम अनेकांना महाग पडू शकतो. अशा वातावरणात आता पक्षांतराचे खेळ रंग भरायला लागले आहेत.
नाशिक महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी अपक्ष नगरसेवक गुरुमितसिंग बग्गा यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. बग्गा हे मुळचे काँग्रेसचे आहेत. आता ते पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. येत्या दोन दिवसांत मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांच्यासोबत अपक्ष नगरसेवक विमल पाटील आणि मुशीर सय्यदही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेस शहराध्यक्षपद मिळण्याची शक्यता
नाशिकच्या काँग्रेसमध्ये माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि त्यांच्याविरोधातला गट प्रबळ आहे. या दोन्ही पैकी कोणत्याही एका गटाला शहराध्यक्षपद मिळाले की, त्यावरून राजकीय सुंदोपसुंदी रंगते. सध्या काँग्रेस शहराध्यक्षपदी शरद आहेर आहेत. मात्र, त्यांची काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी बढती झाल्याने ते प्रभारी म्हणून काम पाहतात. आता त्या जागेवर बग्गा यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. बग्गा 1997 काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. 2007 मध्ये पुन्हा स्वीकृत सदस्य झाले. त्यानंतर दोन वेळा ते पुन्हा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून त्यांनी उपमहापौरपदही भूषविले आहे.
– भाजपातही शहराध्यक्षपद बदल?
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येही राजकीय बदलाची चर्चा सुरू होती. त्यात शहराध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, हिमगौरी आडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या गिरीश पालवे हे शहराध्यक्ष आहेत. दुसरीकडे भाजप नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी नुकत्याच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचेही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे समजते.
– विविध पक्षांच्या नेत्यांचे दौरे
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेही जोरात तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः मनसेप्रमुख राज ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाशिकचा दौरा करत कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे येत्या काळात सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयाराम यांची गर्दी होणार आहे.
Nashik’s number after Ulhasnagar; Game of change in the face of municipal elections
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन