• Download App
    NCW Submits Shocking Report on Nashik TCS Case to CM Fadnavis नाशिक TCS प्रकरण; महिलांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ, राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    Nashik TCS : नाशिक TCS प्रकरण; महिलांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ, राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    Nashik TCS

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Nashik TCS  नाशिक येथील TCS बीपीओ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने सखोल चौकशीअंती 50 पानांहून अधिकचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे.Nashik TCS

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या या अहवालात कार्यस्थळावरील लैंगिक छळ, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे गंभीर ताशेरे ओढण्यात आले असून, ‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी शून्य असल्याचे सांगितले आहे. आरोपींनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक, मानसिक आणि भावनिक शोषण केल्याचा स्पष्ट निष्कर्ष आयोगाने काढला आहे. इतकेच नव्हे तर, हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा अपमान करून महिलांवर विशिष्ट दबाव टाकल्याचा धक्कादायक आरोपही या अहवालाद्वारे करण्यात आला आहे.Nashik TCS



    कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद

    या अहवालात नमूद केल्यानुसार, महिला कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून तक्रार केल्यास बदली किंवा नोकरी गमावण्याची धमकी दिली जात होती. विशेष म्हणजे, ‘पॉश’ समिती पूर्णपणे निष्क्रिय असून कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना ‘विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट’ अंतर्गत तक्रारदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित आरोपींवर बीएनएस कलम 75, 78, 79 आणि 299 अंतर्गत कठोर कारवाई करण्याची शिफारस करतानाच, महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी टीसीएस व्यवस्थापनावरही ताशेरे ओढले आहेत.

    नेमके प्रकरण काय आहे?

    नाशिकमधील TCS मध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आणि मानसिक छळाचे अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले असून, याप्रकरणी आतापर्यंत 8 पीडित महिलांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी एकूण 9 एफआयआर नोंदवल्या आहेत. यामध्ये कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी, एचआर विभागाचे अधिकारी आणि डिलिव्हरी पार्टनर यांचा समावेश असून, त्यांच्यावर बळजबरी, लैंगिक शोषण, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि धार्मिक भावना दुखावणे यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन महिलांसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

    या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन TCS प्रशासनाने अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे की, ते या संपूर्ण तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत. दुसरीकडे, डिलिव्हरी पार्टनर असलेल्या आरोपी महिलेच्या वकिलांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप पाहता नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी विविध स्तरांतून मागणी होत आहे.

    NCW Submits Shocking Report on Nashik TCS Case to CM Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार कुटुंबाच्या राजकीय गेमा; सुनेत्रा पवारांचे पटेल + तटकरेंच्या बरोबर कार्यक्रम, पण क्लेरिकल मिस्टेक मधून दोघांना वगळले राष्ट्रवादीच्या कार्यकारणीतून!!

    Nida Khan Case : निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक; संजय शिरसाटांचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    CM Devendra Fadnavis : राहुल गांधी देशाच्या राजकारणातील रिजेक्टेड माल; CM देवेंद्र फडणवीस म्हणाले – आम्ही त्यांना महत्त्व देत नाही