• Download App
    नाशिक हादरलं , दिवसाढवळ्या भाजप नेत्याची हत्या ; धारधार शस्त्राने केले वार । Nashik shakes, BJP leader killed in broad daylight; War with a sharp weapon

    नाशिक हादरलं , दिवसाढवळ्या भाजप नेत्याची हत्या ; धारधार शस्त्राने केले वार

    सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलन केले आहे. Nashik shakes, BJP leader killed in broad daylight; War with a sharp weapon


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे.शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भाजप नेत्याच्या खूनामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे.



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन करून घराबाहेर बाहेर बोलावून घेतलं. त्यानंतर धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच अमोल इघे यांचा खून झाल्यानंतर नाशिकमध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

    सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलन केले आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अमोल इघे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

    Nashik shakes, BJP leader killed in broad daylight; War with a sharp weapon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : राहुल गांधींना पंतप्रधान निवासावर घातपात घडवायचा होता; महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते – एकनाथ शिंदे

    Devendra Fadnavis : ‘मी महाराष्ट्रातच राहणार!’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जाण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम

    TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांच्या बिहारमध्ये मुसक्या आवळल्या:8 हजारांचा पेपर फोडून दीड कोटीला विकण्याचा कट उधळला