• Download App
    Police Raid Ashok Kharat’s House; Wife Kalpana Fugitive, Son Harshvardhan Detained पोलिसांची अशोक खरातच्या निवासस्थानी धाड; मुलाला घेतले ताब्यात, पत्नी कल्पना फरार

    Ashok Kharat : पोलिसांची अशोक खरातच्या निवासस्थानी धाड; मुलाला घेतले ताब्यात, पत्नी कल्पना फरार

    Ashok Kharat

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Ashok Kharat बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या नाशिक पोलिसांनी, ती मिळून न आल्याने अखेर खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खरात टोळीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे.Ashok Kharat

    अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी नाशिक पोलिसांचे एक पथक खरातच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाल्याची माहिती समोर आली. यावेळी घरात असलेल्या खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीत आणले आहे. याच ठिकाणी एसआयटी (SIT) कडून अशोक खरातची कसून चौकशी सुरू असून, आता बाप-लेकाची समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.Ashok Kharat



    शिर्डीत जमीन बळकावल्याचा गुन्हा; पत्नी आरोपी

    केवळ अंधश्रद्धाच नाही, तर जमिनी बळकावण्यातही अशोक खरातचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्डीतील ४ एकर भूखंडाच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रावसाहेब गोंदकर या शेतकऱ्याला व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून त्याची जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अटकेच्या भीतीने खरातची पत्नी कल्पना फरार झाली आहे.

    नाशिक आणि शिर्डीत शोधमोहीम तीव्र

    कल्पना खरात यांनी पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर आता त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांची दोन पथके नाशिक आणि शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहेत. आरोपींच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात असून, लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

    अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आता त्याच्या मुलालाही ताब्यात घेतल्याने या फसवणुकीच्या जाळ्यात कुटुंबातील इतर सदस्यांचा किती सहभाग होता, हे स्पष्ट होणार आहे. जमिनीचे व्यवहार, आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून जमवलेली मालमत्ता या सर्व अंगांनी पोलीस सध्या तपास करत आहेत.

    Police Raid Ashok Kharat’s House; Wife Kalpana Fugitive, Son Harshvardhan Detained

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!

    Ashok Kharat : भोंदू खरातची SIT कडून 5 तास चौकशी; महिला, नेते, सर्वसामान्यांसाठी 4 वेगवेगळे नंबर

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- माझा विलीनीकरणाला विरोध नव्हता, अजितदादा असताना आणि नसताना होणाऱ्या विलीनीकरणात मोठा फरक