• Download App
    Nashik Corporate Jihad Case: 4 Suspects in Judicial Custody; HR Head Moves High Court नाशिक कॉर्पोरेट जिहाद; चारही संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, संशयित एचआर हेडची जामिनासाठी हायकोर्टात धाव

    Nashik : नाशिक कॉर्पोरेट जिहाद; चारही संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, संशयित एचआर हेडची जामिनासाठी हायकोर्टात धाव

    Nashik

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : Nashik  कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.Nashik

    मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल बलात्कार, विनयभंग, धर्मांतर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संशयित तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, रझा रफिक मेमन या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. संशयितांना सुरुवातीला २९ एप्रिलपर्यंत, त्यानंतर २ मे आणि पुन्हा ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत संशयितांनी अनेक धक्कादायक कृत्यांची कबुली दिली.Nashik



    निदा खान अद्याप फरारच

    या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अटक झालेले संशयित व पीडित तरुणी यांच्यातील प्रमुख दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच आहे. २ मे रोजी झालेल्या तिसऱ्या सुनावणीत कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिला केव्हाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.

    Nashik Corporate Jihad Case: 4 Suspects in Judicial Custody; HR Head Moves High Court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

    Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू