शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला. NASHIK: Corona rapid test positive of three teachers in Indian High School, Manmad; School closed for three days
विशेष प्रतिनिधी
नाशिक : मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.एका शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहे. दरम्यान आता ही शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला.
तसेच संपर्कात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास जाणवल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.हा शिक्षक अकरावी आणि बारावी वर्गाला शिकवतात.खबरदारीचा उपाय म्हणून अकरावी आणि बारावीचे वर्ग ऑनलाईन भरविण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
NASHIK: Corona rapid test positive of three teachers in Indian High School, Manmad; School closed for three days
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- दारूचे ठेके देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतली ५०० कोटी रुपये लाच, जुने सहकारी कवी कुमार विश्वास यांचाच आरोप
- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराला पोलीसांचा दणका, पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक
- तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा