प्रतिनिधी
नाशिक : नाशिक – औरंगाबाद महामार्गावर सकाळी पहाटे 4.25 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन एक खासगी बस अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी तातडीची 5 लाखांची मदतही जाहीर केली आहे. पण हा अपघात नेमका झाल कसा??, बस कशामुळे पेटली आणि म्हणता म्हणता आग कशी चहूबाजूंनी पसरली??, या विषयी सोशल मीडियासह अन्य मीडियामध्ये प्रचंड चर्चा आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण नाशिक हादरले असून सर्वत्र हळहळ देखील व्यक्त करण्यात येत आहे.Nashik bus fire: 11 killed, 38 injured; Urgent help of Chief Minister; But how exactly did the bus catch fire??
पण एवढी मोठी भीषण दुर्घटना नेमकी झाली कशी??, तर… पुसदहून मुंबईच्या दिशेने चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवासी मुंबईच्या दिशेने निघाली होती. ही बस नाशिकमधील नांदूर नाक्याजवळ मिरची हॉटेलजवळ आली आणि तिचा अपघात झाला. या लक्झरी बसला औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोराची धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. ही धडक एवढी जोराची होती, की बसला लगेच आग लागली. आगीचा भडका क्षणात संपूर्ण बसच्या भोवती पसरला. संपूर्ण बसला आगीने आपल्या कवेत घेतलं. अपघाताची वेळ पहाटेची. प्रवासी साखर झोपेत त्यामुळे प्रवाशांना जीव वाचण्यासाठी संधीही मिळाली नाही.
अवघ्या काही क्षणात आगीच्या लोळात प्रवासी होरपळले. 10 ते 12 जण जिवंत जळत असल्याचं पाहून इतर प्रवाशांचाही थरकाप उडाला. धक्कादायक बाब म्हणजे पेट घेतलेले काही प्रवासी हे रस्त्यावरही पडले.
अपघातानंतर झालेला गोंधळ, अपघातानंतर जळत असलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या, आगीच्या ज्वाळांच्या कचाट्यात सापडलेली बस, हे थरकाप उडवणारं दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शीही धास्तावून गेले होते. आगीचे लोट बसच्या बाहेरपर्यंत फेकले जात होते. त्यामुळे मदत करायची म्हटलं, तरी बसच्या जवळ जाणं अनेकांना धोकादायक वाटलं. सकाळी 6.30 वाजेपर्यंत ही बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या अपघातामध्ये बसचा चालक ब्रम्हा मनवर याचाही मृत्यू झालाय. ब्रम्हा हा दिग्रस येथे राहणार होता. इतर मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. आगीत जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय.
बस अपघातातील जखमींची नावे
१. अमित कुमार – वय ३४
२. सचिन जाधव – वय ३०
३. आश्विनी जाधव – वय २६
४. अंबादास वाघमारे – वय ४३
५. राजू रघुनाथ जाधव – वय ३३
६. निलेश प्रेमसिंग राठोड – वय ३०
७. भगवान श्रीपत मनोहर – वय ६५
८. संतोष राठोड – वय २८
९. हंसराज बागुल – वय ४६
१०. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा – वय ७९
११. त्रिशिला शहा – वय ७५
१२. भगवान लक्ष्मण भिसे – वय ५५
१३. रिहाना पठाण – वय ४५
१४. ज्ञानदेव राठोड – वय ३८
१५. निकिता राठोड – वय ३५
१६. अजय देवगण – वय ३३
१७. प्रभादेवी जाधव – वय ५५
१८. गणेश लांडगे – वय १९
१९. पूजा गायकवाड – वय २७
२०. आर्यन गायकवाड – वय ८
२१. इस्माईल शेख – वय ४५
२२. जयनुबी पठाण – वय ६०
२३. पायल शिंदे – वय ९
२४. चेतन मधुकर
२५. महादेव मारुती
२६. मालू चव्हाण – वय २२
२७. अनिल चव्हाण – वय २८
२८. दीपक शेंडे – वय ४०
10 ते 12 जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गाडीतील अन्य सामान आणि प्रवाशांची माहिती घेत, आता पोलीस प्रशासन अग्निशामक हे बचावकार्यात मग्न आहेत, तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृतांच्या नातेवाईकांना तातडीची पाच लाखांची मदत जाहीर केली आहे तसेच जखमींवरच्या उपचारांमध्ये कुठेही कमतरता राहता कामा नये असे आदेश दिले आहेत. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
Nashik bus fire: 11 killed, 38 injured; Urgent help of Chief Minister; But how exactly did the bus catch fire??
महत्वाच्या बातम्या
- धनुष्यबाण कोणाचे? : ठाकरे गटाला शनिवार दुपारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश; अन्यथा निर्णय घ्यायला निवडणूक आयोग मोकळा
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सामान्य जनतेला वैद्यकीय मदतीचा आलेख वाढता
- शरद पवारांच्या सिल्व्हर ओकसमोर आंदोलन करणारे 118 बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत!!
- भारत जोडो यात्रा : केरळमध्ये पोस्टरवर ‘झाकलेले’ सावरकर कर्नाटकात पुन्हा ‘प्रकटले’