विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक महापालिकेतील भाजपचे 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यापैकी 4 नगरसेवकांना भाजपमधून शिवसेनेत प्रवेश देखील दिला आहे. पण या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेनेत नगरसेवक शिवसेनेत का चालले आहेत?, असा सवाल करण्यात येत आहे. याचा नेमका आढावा घेतला तर या नगरसेवकांना शिवसेनेतून तिकीट मिळण्याची खात्री झाली आहे की भाजपमधून तिकीट न मिळण्याची खात्री असल्यामुळे ते शिवसेनेत गेले आहेत?, अशी शंका तयार होत आहे.Nashik BJP – Shivsena: Recruitment of BJP corporators in Shiv Sena in Nashik !!; Or the surety of not getting a ticket in BJP
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रथमेश गिते, हेमलता कांडेकर, डॉ. सीमा ताजणे आणि अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी मातोश्री निवासस्थानी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले.
या नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा मुंबईत सह्याद्री विश्रामगृहावर पक्षप्रवेश झाला. महापालिका निवडणुकीची घोषणा होईपर्यंत शिवसेनेत टप्प्याटप्प्याने भाजपचे 20 नगरसेवक अजून प्रवेश करणार आहे. त्यासाठी दर एक ते दीड आठवड्यात पाच नगरसेवकांच्या हाती शिवबंधन बांधले जाणार आहे. पंचवटी, सातपूर व मध्य नाशिकमध्ये भाजप संघटना खिळखिळी करण्याबरोबरच नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल, असा दावा करण्यात आला.
शहरात प्रारंभी माजी आमदार वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्याने 7 ते 8 हजार मुस्लिम मतदार प्रभाग सतरामध्ये समाविष्ट झाल्याने गिते यांनी शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त निश्चित केला. मात्र प्रवेश करताना अपक्ष मुशीर सय्यद यांना बरोबर घेतल्याने तिघांच्या पॅनलमध्ये दोघांची निश्चिती झाली आहे.
नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी भाजपचे दिनकर पाटील यांच्या कार्यपद्धतीला वैतागून शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले. डॉ. सीमा ताजणे यांची घरवापसी झाली असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा प्रवास करत त्या पुन्हा पती राजेंद्र ताजणे यांच्यासह शिवसेनेत दाखल झाल्या.
मात्र जे नगरसेवक भाजपमधून शिवसेनेत जात आहेत त्यांना भाजप पुढच्या महापालिका निवडणुकीसाठी तिकीट देणार होता का?, देणार असल्यास वॉर्ड बदलणार होता का?, याची चाचपणी करूनच नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरल्याचे नाशिकच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्याचबरोबर एक प्रकारे भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करून हे नगरसेवक नाशिक महापालिकेत सत्ताधारी असताना अँटी इन्कमबन्सीचा जो फटका भाजपला बसला असता अथवा बसू शकतो तो जणू टाळण्यासाठीच अथवा भाजपला बसणारा अँटी इन्कमबन्सीचा फटका कमी करण्यासाठी मदत करत आहेत का?, असा खोचक सवाल विचारला जात आहे.
Nashik BJP – Shivsena: Recruitment of BJP corporators in Shiv Sena in Nashik !!; Or the surety of not getting a ticket in BJP
महत्त्वाच्या बातम्या
- भूषण पटवर्धन यांची NAAC अध्यक्षपदी नियुक्ती
- Russia-Ukraine War : युद्धादरम्यान बायडेन यांनी उघडला खजिना, युक्रेनच्या लष्करी मदतीसाठी 350 मिलियन डॉलर जारी
- Russia-Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देश सोडण्याची ऑफर फेटाळली, अमेरिकेला म्हटले- पळून जाणार नाही, मला शस्त्रे हवीत!
- रशिया-युक्रेन संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार नाही, बँक ऑफ बडोदाच्या अहवालातील मत