वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Narendra Modi’s January 28 Pune tour finally canceled
विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २८ जानेवारीचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याची माहिती आहे.गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुणे दौऱ्याविषयी माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते.पुण्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते.नरेंद्र मोदी पुणे यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन,दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महापालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होतं.मात्र, नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.