• Download App
    Narcotics Control Bureau (NCB) says it is conducting a raid on the residence of actor Armaan Kohli in Mumbai

    ड्रग्ज प्रकरणात अरमान कोहलीच्या अटकेनंतर त्याने शाहरुख खानला स्टार केल्याच्या बातम्या झळकू लागल्या!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला ड्रग्ज प्रकरणात नॉरकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आणि त्यानंतर अरमान कोहलीच्या संबंधी “विशिष्ट positive बातम्या” मीडियामध्ये फिरू लागल्या आहेत. त्यापैकी एक बातमी आहे, अरमान कोहलीने शाहरुख खानचा सुपरस्टार केल्याची…!! Narcotics Control Bureau (NCB) says it is conducting a raid on the residence of actor Armaan Kohli in Mumbai

    अरमान कोहलीने दिवाना सिनेमा सोडला. तो सिनेमा शेवटच्या क्षणी शाहरुख खानला मिळाला आणि त्यानंतर शाहरुखचे करियर बहरले आणि आज तो सुपरस्टार आहे, अशी ही बातमी आहे.

    अरमान कोहलीला नॉरकोटिक्स ब्युरोने चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्याच्या उत्तरांमध्ये भरपूर तफावत आढळल्याने त्याला अटक केल्याचे ब्युरोचे अधीक्षक समीर वानखेडे यांनी काल रात्री सांगितले. अरमान कोहलीला आज कोर्टात हजर करण्यात येईल.

    परंतु अरमान कोहलीच्या अटकेची बातमी पसरताच त्याच्याविषयी बॉलिवूडमधल्या वेगवेगळ्या positive बातम्या पसरविण्यास सुरुवात झाली. यातलीच शाहरुख खानला सुपरस्टार केल्याची बातमी आहे.

    अरमान कोहलीने ज्या फिल्म सोडल्या त्यापैकी 80 टक्के सिंग सुपरहिट झाल्या. ही दुसरी बातमी आहे. त्याने पूर्वी दिलेल्या मुलाखती देखील पुन:प्रसिद्ध केल्या जात आहेत.



    त्याने सोडलेल्या फिल्मपैकी दिवाना ही त्यातली एक फिल्म होती. मी सोडलेल्या फिल्म बद्दल फारसा विचार करत नाही. मला त्याचा पश्चाताप नाही, असे अरमान कोहलीने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

    शाहरुख खानने देखील आपल्याला फिल्म करियर सुरू करायला अरमान कोहली कारणीभूत ठरला असे म्हटले होते. यब बातम्या आता मीडियातून आणि सोशल मीडियातून सध्या फिरते आहेत.

    Narcotics Control Bureau (NCB) says it is conducting a raid on the residence of actor Armaan Kohli in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!