• Download App
    लावालावी करतात म्हणून राऊतांचे नाव "संजय" असावे, पण ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?, नारायण राणेंचा टोलाNarayan Rane targets sanjay raut

    लावालावी करतात म्हणून राऊतांचे नाव “संजय” असावे, पण ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?, नारायण राणेंचा टोला

    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे नेहमी लावालाव्या करत असतात म्हणूनच त्यांचे नाव “संजय” असावे, असा टोला केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लगावला आहे. राऊत जसे वरवर दाखवतात, ते तसे नाहीत. ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की राष्ट्रवादीचे?, असा खडा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला. Narayan Rane targets sanjay raut

    महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष महापालिका निवडणुकीला घाबरत आहेत. कोणत्याच महापालिकेत त्यांची सत्ता येणार नाही आणि मुंबईतली सत्ता शिवसेना गमावेल याची त्यांना खात्री आहे म्हणूनच ते निवडणुका टाळत आहेत, असे टीकास्त्र देखील नारायण राणे सोडले आहे.

    सिंधुदुर्ग येथील सभेत बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? हेच समजत नाहीत. संजय राऊत जसं दाखवतात तसे नाहीत. लावालावीचं काम करतात त्यामुलेच त्यांचं नाव संजय राऊत आहे.’ देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य कधीच तोडलं नाही, असेही राणे म्हणाले. ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होते, असे मत राणे यांनी यावेळी व्यक्त केले.



    संसदेत बोलताना अडखळल्यानंतर ट्रोल झालेले राणे यांनी त्यावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला प्रश्न समाजाला होता, अध्यक्ष्यांना वाटलं तो प्रश्न समजला नसेल असा वाटलं म्हणून अध्यक्षनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा.. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगासंदर्भात माहिती दिली. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे काम सुरू आहे. अधिवेशनमध्ये कायदे करणारी बिल पास होत आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असेही राणे म्हणाले.

    तीन पक्षांना निवडणूक नको आहे. आजचे मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरू
    आहे. मुंबई महापालिकेत दिसेल असे काम करू, असे राणे म्हणाले. मला 55 वर्ष राजकारणात झाली त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता बदल होईलच. पण पत्रकारांना निवडणुकीचे प्लॅन सांगून सुरुंग लावायचं नाही त्यामुळे सांगणार नाही, असेही त्यांनी सांगितल.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21, 22, 23 जानेवारी रोजी उद्योगाच्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं, मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत, वादावादीत तो रस्ता तसाच राहिला, असे राणे यांनी सांगितले.

    Narayan Rane targets sanjay raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!