विशेष प्रतिनिधी
मुंबई : Narayan Rane चार वेळा मुख्यमंत्री राहिले. 10 वर्षे केंद्रीय मंत्री राहिले, पण 83 वर्षांच्या आयुष्यात ते आपल्या जातीला न्याय नाही देऊ शकले. पण आजही पेट्रोल टाकून काड्या लावण्याचे काम मात्र शरद पवार करत आहेत, अशा परखड शब्दांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले. Narayan Rane target Sharad Pawar
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन. ‘सामना’ वृत्तपत्र दाखवत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. नारायण राणे यांनी सुरुवातीला माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याही राजकारणाचे वाभाडे काढले.
नारायण राणे म्हणाले :
सामना वृत्तपत्रात जी भाषा वापरली जात आहे ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे का?? नवीन मराठी शिकणाऱ्यांना मराठी भाषा शिकू नये असं वाटावं, अशी भाषा वापरली जाते. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि आम्हाला गेट आऊट ऑफ इंडिया असे म्हणणारे उद्धव ठाकरे कोण?? हा कसा नेता होऊ शकतो?? याअगोदर पुण्यातही एक घटना घडली होती, तेव्हा झोपला होतास का?? तेव्हा नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करत आहात. एकतर पाय झिजवताय, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मलाच मुख्यमंत्री करा, असं म्हणतात. लाज पण वाटत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी?? मी जवळून दृश्य पाहिलं आहे.
खासदार संजय राऊत काय म्हणतात??, शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले, जोड्याने फोडून काढतात हे मला माहिती नाही. चाबकाने फोडून हाणतात. कधी प्रत्यय दाखवला पाहिजे ना, कसा प्रत्यय असतो, कसं चाबकाने फोडतात, लोकं अनवाणी आंदोलनात उतरले. काय शब्द वापरले?? Narayan Rane
पण शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत, सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत. आजही लावालावी करत आहेत, जातीजातीत भेद निर्माण करत आहेत. चारवेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात 10 वर्षे मंत्री असताना, त्यांनी आरक्षणाची टक्केवारी वाढवली नाही. 83 वर्षांच्या आयुष्यात ते जातीला न्याय देऊ शकले नाहीत आणि आता आरक्षणाची टक्केवारी वाढवायची मागणी ते करतायेत. जाती जातीमध्ये भांडण पेटवण्याचा हा प्रकार आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावर शांततेचा एखादा मोर्चा का काढला नाहीत?? महाराष्ट्राच्या जनतेला शांत राहण्याचे आवाहन का केले नाही??, पुतळा पडला तर त्यापेक्षा चांगला देखणा पुतळा आपण तयार करुयात, असे बोलला असतात, तर तुमची कीर्ती वाढली असती. पण शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतही तुम्ही राजकारण करत आहात. वय वर्षे 83 पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत!!
मला फोन करुन शिवीगाळ करणारा शरद पवारांचा कार्यकर्ता निघाला. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोककल्याणकारी बनावा हे पवारांच्या ध्यानीमनी असायला हवं. शरद पवारांनी बोलायला हवं की, वाद नको. मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो. आपण नव्याने पुतळा उभारावा. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, हे सध्या शरद पवारांचं काम चालू आहे. पण पवारांच्या असल्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही.
– छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण करता, उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्हाला काही वाटत नाही? संजय राऊत भडकवण्याचं काम करत आहेत. ते वातावरण बिघडवत आहेत. राज्य सरकारने या प्रकरणी त्वरित कारवाई करावी. काय चेष्टा आहे का??
Narayan Rane target Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!