• Download App
    मंत्रिपदाचा पदभार घेताच नारायण राणेंचा ॲक्शन मोडमध्ये, प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांना फुटला घाम! । Narayan Rane Takes Charge As MSME Minister, Asked Questions To Officials About GDP And Employment

    मंत्रिपदाचा पदभार घेताच नारायण राणे ॲक्शन मोडमध्ये, प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांना फुटला घाम!

    Narayan Rane Takes Charge As MSME Minister : महाराष्ट्रातले दिग्गज नेते नारायण राणे यांनी केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसह जीडीपी वाढीच्या दिशेने काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नारायण राणे जेव्हा पदभार स्वीकारण्यासाठी ऑफिसमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. Narayan Rane Takes Charge As MSME Minister, Asked Questions To Officials About GDP And Employment


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातले दिग्गज नेते नारायण राणे यांनी केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसह जीडीपी वाढीच्या दिशेने काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नारायण राणे जेव्हा पदभार स्वीकारण्यासाठी ऑफिसमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

    वास्तविक, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असे म्हटले होते की, मी आज पदभार घेतला. आम्ही जीडीपीमध्ये वेग आणण्यासाठी आणि तरुणांसाठी रोजगार सृजन उपायांवर खासकरून लक्ष देणार आहोत. यानंतर राणे जेव्हा कार्यालयात पोहोचले तेव्हा विविध अधिकारी हातात पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. ऑफिसमध्ये प्रवेश करताच नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. राणे यांन विचारले की, मंत्रालयाचे जीडीपीमध्ये किती योगदान आहे? गेल्या दोन वर्षांत किती रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या? तुमच्या हातात कोणीही फाइल घेऊन आले नाही? कोण सांगणार हा डेटा? राणे यांच्या प्रश्नांच्या माऱ्यापुढे उपस्थित अधिकारी नजर चोरू लागले होते.

    राणे यांच्या प्रश्नावर अधिकारी म्हणाले की, काही जण सुटीवर आहेत, काही जण त्यांच्या घरी लग्न असल्याने उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते परतल्यानंतर डेटा उपलब्ध करून देऊ. तथापि, नारायण राणे प्रश्नांवरच थांबले नाहीत, त्यांनी अधिकाऱ्यांना पुढे विचारले की, किती कर्मचारी लग्नासाठी गेले आहेत. यावर अधिकारी गोंधळले. नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना संध्याकाळपर्यंत संपूर्ण डेटासह बैठकीत येण्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे ते नाराज होऊ म्हणाले की, जर काम आणि प्रदर्शन उत्तम नसेल तर सर्वांची बदली केली जाईल. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी नारायण राणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. तसेही मोदी मंत्रिमंडळात मंत्र्यांना अहोरात्र काम करावे लागते, असे खुद्द रावसाहेब दानवेंनी एकदा सांगितले होते.

    Narayan Rane Takes Charge As MSME Minister, Asked Questions To Officials About GDP And Employment

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड