विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेनेला दिल्लीतून डिवचले आहे. बेळगावच्या निकालापासून ते कोरोना निर्बंधांपर्यंत अनेक विषयांवर राणे यांनी शिवसेनेला घेरले. Narayan Rane says, as in belgam shiv sena will face defeat in mumbai muncipal elecetion also
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत पराभव झाला. आता त्याचीच पुनरावृत्ती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही होणार आहे, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
दिल्लीत आपल्या २८ अकबर रोड या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेला अनेक मुद्द्यांवरून घेरले. येत्या ९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या उपस्थितीतत चिपी विमानतळावरून विमानवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले, की बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा दणकून पराभव झाला आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत नक्की होणार आहे, असे भाकीत राणे यांनी वर्तविले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर नारायण यांचे मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच बंदिस्त होऊन घरातच बसून रहायचे आहे, असा टोला राणे यांनी लगाविला. ते पुढे म्हणाले, केवळ हिंदूंचे सण आणि उत्सव आल्यावरच राज्य सरकारला करोना संसर्गाची आठवण येते. देशात फक्त महाराष्ट्रातच तिसरी लाट येईल, असे राज्य सरकार सांगत आहे. मात्र, त्यांचे सत्ताधारी पक्ष आपले सर्व राजकीय कार्यक्रम, मेळावे मोठी गर्दी जमवून घेतात, तेव्हा करोना होत नाही. घरावर दगडं फेकायला गर्दी पाठवतानाही करोना होत नाही, केवळ हिंदूंचे सण साजरे करतानाच करोना होतो. मात्र, आम्ही आमचे सण आणि उत्सव योग्य ती काळजी घेऊन साजरे करणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.
घरावर दगडं फेकणाऱ्यांचा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री करतात, ही नेमकी कोणती विचारसरणी आहे; असा सवाल राणे यांनी विचारला. शिवसेनेने आजपर्यंत कोकणासाठी आणि कोकणी माणसासाठी काहीही केले नाही. नवे काहीच करायचे नाही आणि जे आहे ते बंद करायचे, असा शिवसेनेचा आजवरचा इतिहास आहे. अतिवृष्टी आणि महापुराची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे कोकणाचा विकास आम्ही केला, या शिवसेनेच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही राणे यांनी यावेळी नमूद केले.
Narayan Rane says, as in belgam shiv sena will face defeat in mumbai muncipal elecetion also
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus Case : पेगासस प्रकरणावर उत्तर देण्यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टाला मागितला वेळ, सुनावणी 13 सप्टेंबरपर्यंत तहकूब
- हॉकीला राष्ट्रीय खेळ घोषित करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार, इतर खेळांवरही खर्च करण्याची होती मागणी
- Modi Express : गणरायाची आरती म्हणत प्रवाशांनी व्यक्त केला आनंद, १८०० जणांसह मुंबईहून सावंतवाडीला मोदी एक्स्प्रेस रवाना
- उत्तर प्रदेशच्या निवडणुकांबद्दल ओवैसींचा मोठा दावा, म्हणाले – 100 जागा लढू आणि जिंकू, इतर पक्षांवर केली आगपाखड
- मायावतींच्या सभेत दिसले शंख, गणपती, त्रिशूल अन् जय श्रीराम; म्हणाल्या, दलितांवर पूर्ण विश्वास, प्रबुद्ध वर्गाच्या मदतीनेच पूर्ण बहुमताचे सरकार!