• Download App
    कोणाच्या वहिनीवर कोणी अ‍ॅसिड फेकले...??; नारायण राणेंचे गंभीर आरोप कोणावर…??, जन आशीर्वाद यात्रेत जोरदार चर्चा|Narayan Rane on rampage in jan aashirwad yatra in ratnagiri

    कोणाच्या वहिनीवर कोणी अ‍ॅसिड फेकले…??; नारायण राणेंचे गंभीर आरोप कोणावर…??, जन आशीर्वाद यात्रेत जोरदार चर्चा

    प्रतिनिधी

    रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नाहगिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.Narayan Rane on rampage in jan aashirwad yatra in ratnagiri

    पण याच जन आशीर्वाद यात्रेत भाषण करताना त्यांनी काही जुन्या वादग्रस्त प्रकरणांचा उल्लेख करून चर्चेला जबरदस्त हवा दिली. ते म्हणाले, की माझ्या वाटेला जाऊ नका. मी सोडणार नाही. यावेळी त्यांनी एका अ‍ॅसिड प्रकरणाचा दाखला देत खळबळ उडवून दिली. अद्याप कोणाचे नाव न घेता नारायण राणे यांनी हा आरोप केला आहे.



    त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? याबाबत सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष जन आशीर्वाद यात्रेतही विचारणा होऊन चर्चा रंगायला लागली आहे.

    नारायण राणे म्हणाले, ती आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला… काय हे संस्कार आहेत? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार आहे. सुशांतची केस संपलेली नाही. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. आम्हाला जो कायदा तोच कायदा तुम्हालाही आहे.

    दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड नाही. पण तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता दोन दिवसांत आवाज खणखणीत झाल्यानंतर त्यांची वाजवणार.” असा सज्जड दमही त्यांनी दिला.पण नारायण राणे यांच्या भाषणानंतर कोण वहिनी… कुणाची वहिनी… कुणी ऍसिड फेकले…, वगैरे चर्चांना जोरदार उधाण आले आहे.

    Narayan Rane on rampage in jan aashirwad yatra in ratnagiri

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Uday Samant : हिंदी सक्तीचे धोरण उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातले; आदित्य ठाकरेंकडूनही पाठराखण, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

    Thackeray Brothers : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 5 जुलैला राज ठाकरेंचा मोर्चा, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंचे धरणे आंदोलन

    Babanrao Lonikar : बबनराव लोणीकर यांना उपरती : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समजावणीनंतर शेतकऱ्यांविरोधात न बोलण्याची ग्वाही