विशेष प्रतिनिधी
कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. राणे यांचा ताफा शिवसेना कार्यालयासमोर जात होता. त्यावेळी काही शिवसैनिक हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राणेंनीही आपली गाडी काही वेळ तिथेच थांबवली आणि घोषणाबाजी करणाऱ्या शिवसैनिकांवर नजर रोखली!Narayan Rane kept an eye on those shouting slogans against him and ….
राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात दाखल होण्यापूर्वीत मंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी इशारा दिला होता. राणेंनी वैयक्तिक टीका केली तर जशास तसं उत्तर मिळेल असं वैभव नाईक म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर राणेंची जनआशीर्वाद यात्रा कुडाळमध्ये दाखल झाली.
त्यावेळी शिवसेना कार्यालयासमोर राणेंचा ताफा पोहोचला असता उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात भगवे झेंडे होते. ही घोषणाबाजी पाहून राणेंनीही आपली गाडी काही वेळ थांबवली आणि शिवसैनिकांवर नजर रोखली.
या प्रकारानंतर राणे म्हणाले, आमदार काय करतात तर धमकी देतात की जनआशीर्वाद यात्रा आम्ही येऊ देणार नाही. रस्त्यानं येत होतो तेव्हा गाडीच्या मागे लपत होते. मी मुद्दाम गाडी उभी केली. गाडी उभी केल्यावर जो तो मागे पुढे मागे पुढे जायला लागला. शेवटी पोलीस आले.
त्यांनी गाडी पुढे न्यायला सांगितली. काय दम आहे हो यांच्यात? आज महाराष्ट्रात 10 दिवस झाले फिरतोय तरी कुणी गाडी आडवेना. तसे गाडीचे टायर मोठे आहेत आमच्या. मला काही फरक पडत नाही. धमक्या बिमक्या नको देऊ.
Narayan Rane kept an eye on those shouting slogans against him and ….
महत्त्वाच्या बातम्या
- आयकर विभाागाचे पोलाद उत्पादक कारखानदारावर छापे, १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड
- अफगाणिस्तानचा निधी जागतिक बँकेने रोखला, तालिबानमुळे अनेक प्रकल्प रखडणार
- रेल्वेची सर्वसामान्यांना भेट, वातानुकूलित थ्री टायर इकॉनॉमी प्रवास स्वस्त होणार
- अफगाणिस्तानचा माजी मंत्री बनलाय जर्मनीत चक्क फूड डिलीव्हरी बॉय