• Download App
    नांदेड एक झलक होती, सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशाराPNanded was a glimpse, if the government does not take notice, we can do what we want, Sambhaji Raje Chhatrapati warns the Chief Minister

    नांदेड एक झलक होती, सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नांदेडला आम्ही न बोलवता सुद्धा ५० ते ७० हजार लोकं जमली होती. आवाज उठवायचा म्हटलं तर मी तेही करू शकतो. जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो. नांदेड फक्त एक झलक होती. तीही नं सांगता, मग सांगून बघू का? मग बघा अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.Nanded was a glimpse, if the government does not take notice, we can do what we want, Sambhaji Raje Chhatrapati warns the Chief Minister

    कोल्हापुरात १६ जूनला मूक आंदोलन झालं. सर्व राज्यकर्ते, आमदार, खासदार यांनी जबाबदारी पाळली. आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली आणि चचेर्ला बोलावलं. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आरक्षण सोडून जे प्रश्न आहेत ते १५ दिवसात सोडवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. २ महिने होऊन गेले तरी सरकार काहीही करत नाही, अशा शब्दात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



    संभाजीराजे म्हणाले की, सरकारने ठरवावे तेव्हा बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावे लागेल. त्यासाठी तयारी आहे. पुन्हा नांदेडला जशी गर्दी जमली तशी गर्दी झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. हे सरकारला चालेल का? समाजाला वेठीस न धरता एकटं आंदोलन करू ज्यामुळे गर्दी होणार नाही.
    नांदेडला जे मूक आंदोलन झालं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यातून लोकांच्या भावना दिसून आल्या.

    मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिले त्याचं उत्तर मी आज देत आहे. रिव्ह्यू पिटीशन दाखल केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. भोसले समितीचा अहवाल प्राप्त झाला पण पुढे काय? पुढचा अ‍ॅक्शन प्लॅन काय? हे काही ठरलेलं नाही. मला सरकारला प्रांजळपणे सांगायचं आहे. तुम्हाला असामान्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? रिव्ह्यू पिटीशनचा निकाल आल्यावरच पुढची दिशा ठरवणार का? असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय.

    नवीन एक आयोग स्थापन करण्याची माहिती समोर आली. पण आम्ही अजून दोन वर्षे थांबायचं का? सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल. त्यासाठी काहीही केलं जात नाही. आम्ही कायदेशीर अभ्यास करत आहोत, असं उत्तर दिलं जाते. हे उत्तर आहे का? सिलेक्शन झालेल्या मुलांचा दोष काय? नियुक्त्या झालेल्यांचा दोष काय?

    ज्यांना एसईबीसी मिळाली नाही ते परत ईडब्ल्यूएस मध्ये जाणार. पुन्हा ते कोर्टात जाणार. यावर तोडगा काढा म्हटल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असं सांगतात. ओबीसी प्रमाणे ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला द्या, अशी मागणी केली तरी त्या दिल्या जात नाहीत, असंही संभाजीराजे म्हणाले.

    हे पत्र मुख्यमंत्री किंवा सरकारमधील कुणीही तयार केलेलं नाही. अधिकारी वगार्नं तयार केलं आहे, हे आपण ठामपणे सांगू शकतो. जर यावर निर्णय झाला नाही तर संभाजीराजे समाजासाठी आझाद मैदानात एकटा बसेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला.

    विजय वडेट्टीवार हे समाजद्वेषी आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, अशी सूचना संभाजीराजे यांनी केली. ते म्हणाले, मी छत्रपती घराण्याचा वंशज आहे. माझं एक प्रामाणिक मत आहे की, जो वंचित आहे त्याला आरक्षण मिळायला हवं. मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. कोण काय समाजाचे प्रश्न माडतं त्यापेक्षा ते किती मार्गी लागतात हे महत्वाचं आहे. विनायक मेटे प्रश्न मांडत असतात त्यांचं कौतुक आहे.

    माझी कुणीही दिशाभूल करु शकत नाही. मी माझे मुद्दे प्रमाणिकपणे मांडत असतो. संसदेत किंवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मी माझे मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत. आमची ताकद कमी पडत नाही. नांदेड आंदोलन ही एक झलक होती. कोरोनामुळे थोडं नमतं घेतोय, याचा अर्थ असा नाही की आम्ही कमी पडतोय. आम्ही सरकारला अल्टीमेटम देत नाही. पण सरकारनं याचा विचार करावा. आम्ही कधीही आंदोलनाला बसू, गर्दी झाली तर सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

    Nanded was a glimpse, if the government does not take notice, we can do what we want, Sambhaji Raje Chhatrapati warns the Chief Minister

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!