Friday, 9 May 2025
  • Download App
    कोळसा घोटाळ्याची कोर्ट कमिटी नंतर जेपीसी चौकशी होऊ शकते, तर अदानीबाबत का नाही??; नानांचा पवारांना रोकडा सवालNana patole targets sharad Pawar and PM Narendra modi over adani issue

    कोळसा घोटाळ्याची कोर्ट कमिटी नंतर जेपीसी चौकशी होऊ शकते, तर अदानीबाबत का नाही??; नानांचा पवारांना रोकडा सवाल

    वृत्तसंस्था

    मुंबई : अदानी मुद्द्यावर काँग्रेसपेक्षा वेगळ्या स्वर काढल्याबरोबर काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आता एकापाठोपाठ एक तुटून पडल्याचे दिसत आहे. आधी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी अदानी मुद्द्यावर पवारांचे वैयक्तिक मत आहे, पण काँग्रेस जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती चौकशीच्या मुद्द्यावर ठाम आहे, असे स्पष्ट केले होते.

    त्यानंतर देखील शरद पवारांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अदानींचे पुन्हा एकदा समर्थन केले. हिंडेनबर्ग सारख्या कोणत्याही परकीय संस्थेच्या रिपोर्टच्या आधारे देशातल्या उद्योगपतीवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले. पण त्याचे योगदान पाहिले पाहिजे असे त्यांनी काँग्रेसला सुनावले आहे. Nana patole targets sharad Pawar and PM Narendra modi over adani issue

    आता त्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकाच वेळी सुनावले आहे. सावरकर मुद्द्यापाठोपाठ अदानी मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधली दरी रुंदावत चालली आहे.



    आगामी मुद्द्यावर जेपीसी चौकशीची गरज नाही त्यातून काही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर नानांनी त्या वक्तव्याचे “पवारांचे वैयक्तिक मत” अशी संभावना केली आहे. त्याच वेळी जर कोळसा घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाच्या कमिटी नंतर जेपीसी अर्थात संसदीय समितीची चौकशी होऊ शकते, तर अदानी प्रकरणात संसदीय समितीची चौकशी व्हायला काय हरकत आहे??, असा सवाल नानांनी केला आहे.

    अडाणींच्या कंपनीतले पैसे एलआयसी, प्रॉव्हिडंट फंड यातून गुंतवलेले आहेत. हा जनतेचा पैसा आहे. त्याविषयी संपूर्ण देशात संशयाचे वातावरण आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही चोरी केली नाही, तर मोदींना भीती कशाची वाटत आहे??, होऊ द्या ना जेपीसी चौकशी!!, असे आव्हान नाना पटोले यांनी मोदींना दिले आहे आणि त्यासाठीच त्यांनी कोळसा घोटाळ्यातल्या जेपीसी चौकशीचे उदाहरण दिले आहे.

    Nana patole targets sharad Pawar and PM Narendra modi over adani issue

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस