• Download App
    ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीला राजकीय म्हणणे चुकीचे – नाना पटोले |Nana Patole targets BJP

    ठाकरे-फडणवीस यांच्या भेटीला राजकीय म्हणणे चुकीचे – नाना पटोले

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे – कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीला राजकीय भेट म्हणणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. तसेच ही भेट योगायोगाने झाली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.Nana Patole targets BJP

    ठाण्यात विविध कार्यक्रमात बोलताना पटोले म्हणाले, जे पाप भाजपने जाणीवपूर्वक देशातील जनतेच्या विरोधात केले आहे, त्या पापाचा घडा फुटण्याची वेळ आली आहे. तसेच राज्यातील राजकारणात यापुढे ६० टक्के तरुण आणि ४० टक्के जुने लोक असतील.



    त्याचबरोबर महाराष्ट्रात काँग्रेसचाच विजय होईल आणि येत्या काळात ठाण्यातही बदललेले चित्र दिसेल. ठाणे शहर काँग्रेस पक्ष संघटनेत काही बदल होणार असल्याचेही संकेत त्यांनी या वेळी दिले.

    Nana Patole targets BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhujbal : आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?, भुजबळांचा पलटवार

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप