विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patole काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्याची तुलना प्रभू श्रीरामांच्या कार्याशी केल्याने राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू रामचंद्रांचे काम शोषित व पीडितांची सेवा करणे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे होते. राहुल गांधी तेच काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींची तुलना रामाशी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. कारण काँग्रेस हा पक्षच मुळात रामविरोधी आहे, असे सेना नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.Nana Patole
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येत जाऊन अद्याप श्रीरामाचे दर्शन घेतले नाही. पत्रकारांनी याविषयी नाना पटोले यांनी छेडले असता त्यांनी राहुल गांधी हे श्रीरामासारखेच काम करत असल्याचे स्पष्ट केले. प्रभू श्रीराम सर्वांच्याच मनात असतात. प्रत्येकाच्या विचारांत असतात. शोषित व पीडित लोकांची सेवा करणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच त्यांचे काम होते. राहुल गांधी तेच काम करत आहेत. राहुल गांधी प्रभू श्रीरामाच्याच आदर्शांनुसार वाटचाल करत आहेत. त्यामुळे प्रभू रामाला केवळ मंदिरापर्यंत मर्यादित ठेवता कामा नये. त्यांचे विचार व कर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे पटोले म्हणाले.Nana Patole
राहुल गांधी अयोध्येच्या दौऱ्यावर जातील तेव्हा ते जरूर रामलल्लांचे दर्शन घेतील. कारण, राहुल यांचे वडील राजीव गांधी यांनीच रामलल्ला मंदिराचे कुलूप उघडले होते हे सर्वश्रूत आहे. आज काहीजण केवळ दिखावा करण्यासाठी मंदिरात जातात. पण राहुल गांधी तसे नाहीत. राहुल गांधी प्रभू श्रीरामचंद्रांचेच काम करत आहेत. त्यामुळे त्यांना तसा दिखावा करण्याची गरज नाही, असेही पटोले यावेळी बोलताना म्हणाले.
अटोले – पटोलेंचे विधान अत्यंत हास्यास्पद – संजय निरुपम
दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार संजय निरुपम यांनी या प्रकरणी नाना पटोले व राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, नाना पटोलेंचे विधान अत्यंत हास्यास्पद आहे. कारण, काँग्रेस हा पक्षच मुळात रामविरोधी आहे. अयोध्या हे श्रीरामाचे जन्मस्थान आहे. तेथील रामजन्मभूमी मंदिराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला. तिथे मंदिर होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केला.
ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याच काँग्रेसच्या अटोले – पटोलेंनी (नाना पटोले) आपल्या नेत्याची तुलना रामाशी केली. मी त्यांना एवढेच सांगेन की, कृपया प्रभू रामाच्या नावाचा अपमान करू नका. तुम्हाला तुमच्या नेत्याची तुलना करायची असेल, तर त्यांच्या वर्तणुकीनुसार रामाशी नव्हे तर रावणाशी करा, असे ते म्हणाले.
मुंबईचा महापौर मराठी भाषिकच ठरवतील
संजय निरुपम यांनी यावेळी मुंबईचा महापौर मराठी जनताच ठरवणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, मुंबईचा नवा महापौर महायुतीचाच होईल. त्याचा निर्णय मुंबईचा मराठी भाषिक समाज घेईल. मराठी समाज ठरवेल तोच पुढचा महापौर बनवेल. मराठा भाषिक लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते महाराष्ट्रात फक्त जय महाराष्ट्र बोला जय श्रीराम म्हणू नका असे केव्हाही म्हणाले नसते. पण आज ज्या पक्षांचे अस्तित्व संपले आहे, ते स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी इथे जय श्रीराम नव्हे तर जय महाराष्ट्रच बोला अशा प्रकारची विधाने करत आहेत.
महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनीच मराठी बोलले पाहिजे असा आमचा आग्रह आहे. पण प्रभू श्रीरामांशी विद्रोह करून नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानत असाल तर तुम्ही कधीही रामद्रोही होऊ शकत नाही. जे रामद्रोही झाले ते मुद्दाम हिंदू समाजात फूट पाडू इच्छित आहेत. कारण ही जिहादींची डिझाइन आहे, जिहादींचा प्लॅन आहे. आज ज्या प्रकारे ठाकरे गट व मनसे निवडक मुस्लिम मतांसाठी जिहादींशी हातमिळवणी करत आहेत, ते पाहता ते प्रभू श्रीराम व हिंदू समाजाच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट होते, असे निरुपम म्हणाले.
वंदे मातरम भारतात नव्हे तर पाकिस्तानात म्हणायचे काय?
संजय निरुपम यांनी यावेळी वंदे मातरम गीताशी संबंधित वादावरूनही महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, वंदे मातरम हे हिंदुस्थानचे राष्ट्रगीत आहे. एक प्रकारचे नॅशनल अँथम (National Anthem) आहे. हे दीडशे वर्ष जुने गीत आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई लढली जात होती, तेव्हा आपल्या लाखो पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. अशा वंदे मातरमवर कुणाला आक्षेप असेल, तर त्यांनी वंदे मातरम हे भारतात नव्हे तर पाकिस्तानात म्हणावे काय? हे सांगावे, असे संजय निरुपम म्हणाले.
Nana Patole Compares Rahul Gandhi Lord Ram Politics PHOTOS VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी चिंचवडच्या विकासाचे सारथी लक्ष्मण जगताप यांच्या शक्तिस्थळ’चे लोकार्पण
- Indigo : इंडिगोवर ₹458 कोटींहून अधिकचा जीएसटी दंड; एअरलाइनने म्हटले- आदेशाला आव्हान देणार
- Army Animal : प्रजासत्ताक दिनी सैन्याची पशु तुकडी देखील परेड करणार; बॅक्ट्रियन उंट, झांस्कर टट्टू, रॅप्टर्स आणि श्वान मार्च करतील
- एक हँडशेक केला, तर पाकिस्तान हुरळला, चर्चेसाठी भारताच्या कच्छपी लागला!!