• Download App
    नाना – भाईंचा काँग्रेसी स्वबळाचा एक सूर; पण एच. के. पाटलांचा तिसराच ताल...!! nana patole, bhai jagtap pitches for congress going alone in maharashta polls, but h. k. patil cautioned them

    नाना – भाईंचा काँग्रेसी स्वबळाचा एक सूर; पण एच. के. पाटलांचा तिसराच ताल…!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे काही आलबेल चालल्याचे भासवले जात असताना काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी एका सूरात स्वबळाचा नारा दिला आहे. पण काँग्रेसचे केंद्राने नेमलेले महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी तिसराच ताल धरला आहे. nana patole, bhai jagtap pitches for congress going alone in maharashta polls, but h. k. patil cautioned them

    आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीच आग्रहाने सांगून पक्षात जान आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सूरात आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील आपला स्वबळाचा सूर मिसळला आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेते एकाच सूरात बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे.

    भाई जगताप यांनी राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना स्वबळावर लढू देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. भाई म्हणाले, की काल-परवापर्यंत काँग्रेसची कोणी दखल घेत नव्हते. आज फक्त काँग्रेस काय करतेय हे बघत आहेत. मग ती मुंबई असो वा महाराष्ट्र असो. माझी राहुल गांधींना विनंती आहे, सोनिया गांधींना विनंती आहे, की आम्हाला स्वबळावर लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम…

    नाना पटोले आणि भाई जगताप यांनी एका सूरात स्वबळाचा नारा लावल्याने महाविकास आघाडीच्या सरकारला सत्ताकाळातला ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच हादरे बसत असल्याचे लक्षात येताच काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी स्वबळाच्या नाऱ्यावर जपून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका अजून साडेतीन वर्षे लांब आहेत. त्याचा सध्या पक्षश्रेष्ठींपुढे विचार नाही. योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षाच्या प्रभारींनी नाना आणि भाईंनी लावलेल्या स्वबळाच्या एक सूराला तिसराच ताल वाजवला असल्याचे बोलले जात आहे.

    nana patole, bhai jagtap pitches for congress going alone in maharashta polls, but h. k. patil cautioned them

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस