• Download App
    Naigaon BDD Chawl Makeover: CM Fadnavis Hands Over Keys to 864 New 2BHK Homes VIDEOS नायगाव बीडीडी चाळीचा कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरण, यापुढे वर्षातून किमान दोन वेळा घर वाटपाचे कार्यक्रम

    CM Fadnavis : नायगाव बीडीडी चाळीचा कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरण, यापुढे वर्षातून किमान दोन वेळा घर वाटपाचे कार्यक्रम

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis  मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकांचे वाटप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 इमारतींमधील या सदनिकांचे वितरण पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले असून, यामध्ये विशेष बाब म्हणजे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी, त्यांचे वारस आणि कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 423 सदनिकांचा समावेश आहे.CM Fadnavis

    हक्काच्या घराची चावी हातात पडताच बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांचा ऊर भरून आला. ही चावी स्वीकारताना भावनांच्या भरात काहींचे हात थरथरत होते, तर काहींच्या चेहऱ्यावर हक्काचे घर मिळाल्याचे समाधान आणि कृतज्ञता स्पष्टपणे जाणवत होती. रहिवाशांच्या जीवनातील हा अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण पाहून देवेंद्र फडणवीस यांनीही समाधान व्यक्त केले.CM Fadnavis



    मुख्यमंत्री काय म्हणाले?

    या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा राज्यामध्ये गेली 40 वर्षे गाजणारा मुंबईतला एक विषय होता. ज्यावेळी मी मुख्यमंत्री म्हणून 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतले महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरु केला, त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत. तर खूप जुन्या बिल्डींग आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. आणि प्रत्येक वेळी कोणी तरी नवा बिल्डर त्या ठिकाणी प्रपोजल तयार करतो.

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होते, चिंतन होते. ते चिंतन होईपर्यंत दुसरा कोणी तरी बिल्डर येतो. तो जुने कसे चुकीचे आहे, नवीन माझे कसे चांगले आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्धे लोक याच्या बाजूने अर्धे लोक त्याच्या बाजूने असे करता करता ते स्वप्न 30-35 वर्षे पुनरविकासाचे पूर्ण होत नव्हते. म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरवशावर हे काम करायचे झाले तर हे फार कठिण आहे. जोपर्यंत शासन स्वत: हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे काही शक्य नाही. म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलवून सांगितले आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल. आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वत: त्या ठिकाणी काम करेल. तो निर्णय आपण केला.

    सुरुवातीला काही हितसंबंधी गटांनी लोकांची दिशाभूल करून या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र बीडीडी चाळीतील रहिवाशांनी सरकारवर पूर्ण विश्वास दाखवला. या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आम्ही प्रकल्पाची अतिशय सुंदर आखणी केली. बांधकामाचा दर्जा जागतिक स्तराचा असावा, या उद्देशाने आम्ही ‘L&T’ आणि ‘टाटा’ सारख्या देशातील सर्वोत्तम कंपन्यांनाच या कामात सहभागी करून घेण्यासाठी कडक निकष लावले. यामुळेच आज एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून या ऐतिहासिक प्रकल्पाचे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने सुरू झाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाच्या प्रवासात अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आल्या, परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने त्या सर्व समस्या तातडीने मार्गी लावल्या. कामाला गती मिळाल्यामुळेच आज वरळी आणि नायगाव येथील टप्पे यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. मला आनंद आहे की, पहिल्या टप्प्यातील सदनिकांचे वितरण झाले असून, यापुढे वर्षातून किमान दोन वेळा अशा प्रकारे घर वाटपाचे कार्यक्रम करून रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरात प्रवेश मिळवून दिला जाईल.

    23 मजल्यांच्या एकूण 20 उत्तुंग इमारती उभारल्या जाणार

    नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 6.45 हेक्टरच्या विस्तीर्ण भूखंडावर सध्या 3,344 भाडेकरू वास्तव्यास असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन टप्प्यांत राबविला जात आहे. या प्रकल्पात प्रत्येकी 23 मजल्यांच्या एकूण 20 उत्तुंग इमारती उभारल्या जाणार आहेत. सुरुवातीला येथे तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळी होत्या, ज्यांच्या जागी आता सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी आधुनिक गृहसंकुले उभी राहत आहेत.

    उर्वरित 537 सदनिकांचे बांधकाम एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

    प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ‘प्लॉट ब’ मधील एकूण 1,401 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यापैकी 5 इमारतींमधील 864 सदनिकांचे काम पूर्ण झाले असून, आज त्यांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित 537 सदनिकांचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात असून एप्रिल 2026 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण भूखंडापैकी सुमारे 65 टक्के जागेचा वापर केवळ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना मोकळी आणि प्रशस्त जागा उपलब्ध होईल.

    Naigaon BDD Chawl Makeover: CM Fadnavis Hands Over Keys to 864 New 2BHK Homes VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supriya Sule : बारामतीपासून नागपूरपर्यंत गॅसची अडचण; सरकारने सत्य कबूल करावे; सुप्रिया सुळेंचे आवाहन; म्हणाल्या- गॅस तुटवडा का नाकारता?

    Jitendra Awhad : शिवरायांबाबतच्या विधानावरून विधानसभेत वादंग; दादा भुसे, नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा; जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी

    Chhagan Bhujbal : LPGचे उत्पादन 11 हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवले; केरोसीन पुन्हा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न