प्रतिनिधी
नागपूर : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला आणखी एक वेगळा आयाम जोडला जात आहे. या संदर्भातली माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूर ते पुणे अंतर पाहता सध्या या प्रवासाला रस्ते मार्गाने 14 ते 16 तास लागतात. तोच प्रवास आता 8 तासांवर येणार आहे.Nagpur to Pune journey will be possible in just 8 hours; Information about Nitin Gadkari
सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे – संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे ने जोडण्यात येईल. हा महामार्ग NHAI द्वारे संपूर्ण नवीन अलाईंमेंट घेऊन तयार करण्यात येईल, यामुळे पुणे – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर – छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे. #PragatiKaHighway, असे नितीन गडकरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्ट बरोबरच गडकरींनी प्रस्तावित अलाईनमेंटचा नकाशाही जोडला असून त्याद्वारे या मार्गावरील प्रवास कसा सुकर होणार आहे, हे स्पष्ट होत आहे.
सध्या नागपूर ते पुणे अंतर पाहता प्रवासाला साधारण 14 ते 16 तास लागतात आता हा प्रवास 8 तासांवर येणार आहे.
Nagpur to Pune journey will be possible in just 8 hours; Information about Nitin Gadkari
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री