• Download App
    नागपुर : एसटी कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न|Nagpur: ST employee attempted suicide

    नागपुर : एसटी कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

    सुरेश हे एसटीतील घाटरोड आगारात वाहक आहेत.तसेच प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.Nagpur: ST employee attempted suicide


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान बऱ्याच कर्मच्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशातच हिंगण्यातील सुरेश बोधले यांनी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.

    सुरेश हे एसटीतील घाटरोड आगारात वाहक आहेत.तसेच प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे ते बडतर्फ किंवा निलंबित नाही .दरम्यान संपामुळे ते नियमितपणे कामावर गैरहजर असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.



    सुरेश बोधले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी शेतात एक व्हिडीओ बनविला. त्यात त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पगार झाले नसल्याचे सांगितले.तसेच शेतीच्या प्रकरणात प्रशासनातील अधिकार्‍यांकडून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे. पैशांची मागणी होत असल्याचा आरोप बोधले यांनी केला आहे.

    आपल्या शेतीचा रस्ता दोन परप्रांतीय लोकांनी अडविला आहे. शेतीच्या प्रकरणात अधिकार्‍यांकडून तसेच परप्रांतीय लोकांकडून मानसिक त्रास होत आहे. आपण विष घेऊन आत्महत्या करीत असल्याचे बोधले यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

    Nagpur: ST employee attempted suicide

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा