सुरेश हे एसटीतील घाटरोड आगारात वाहक आहेत.तसेच प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.Nagpur: ST employee attempted suicide
विशेष प्रतिनिधी
नागपूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान बऱ्याच कर्मच्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशातच हिंगण्यातील सुरेश बोधले यांनी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.
सुरेश हे एसटीतील घाटरोड आगारात वाहक आहेत.तसेच प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.त्यामुळे ते बडतर्फ किंवा निलंबित नाही .दरम्यान संपामुळे ते नियमितपणे कामावर गैरहजर असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
सुरेश बोधले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी शेतात एक व्हिडीओ बनविला. त्यात त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पगार झाले नसल्याचे सांगितले.तसेच शेतीच्या प्रकरणात प्रशासनातील अधिकार्यांकडून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे. पैशांची मागणी होत असल्याचा आरोप बोधले यांनी केला आहे.
आपल्या शेतीचा रस्ता दोन परप्रांतीय लोकांनी अडविला आहे. शेतीच्या प्रकरणात अधिकार्यांकडून तसेच परप्रांतीय लोकांकडून मानसिक त्रास होत आहे. आपण विष घेऊन आत्महत्या करीत असल्याचे बोधले यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
Nagpur: ST employee attempted suicide
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाची चाचणी केव्हा करावी, प्रश्न पडलाय ?; आयसीएमआरकडून नागरिकांना उत्तर
- गृह विलगीकरण झालेल्या कोरोना रुग्णांसाठी केंद्राकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर
- सोशल मीडियावर हिंदू देवी-देवतांच्या नावाने अश्लिल गट, हिंदू महिल लक्ष्य होत असल्याने बदला घेण्यासाठी बुली बाईट अॅप
- देशामध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू, एकाच शाळेत तब्बल ५५ विद्यार्थ्यांना कोरोना
- स्वदेशी बनावटीची युद्धनौका विक्रांत चाचण्यांसाठी पुन्हा खोल समुद्रात रवाना