Nagpur Police Arrested Fake Doctor : कोरोना कालावधीत फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नागपुरातही कोरोना रुग्णांवर बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. या बनावट डॉक्टरकडून ऑक्सिजन सिलिंडर आणि सिरींजही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. Nagpur Police Arrested Fake Doctor Treating For Covid Patient
विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरोना कालावधीत फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नागपुरातही कोरोना रुग्णांवर बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. या बनावट डॉक्टरकडून ऑक्सिजन सिलिंडर आणि सिरींजही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करणारी ही व्यक्ती 12वी पास आहे. आधी फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या आरोपीने नंतर स्वत:चा दवाखानाच थाटला. चंदन नरेश चौधरी असे आरोपीचे नाव आहे. मागच्या पाच वर्षांपासून तो एक फार्मसी चालवत होता. ही घटना नागपूरच्या कामठीची आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मागच्या पाच वर्षांपासून तो स्वत:चा दवाखाना चालवत आहे. बनावट डॉक्टर बनून त्याने असंख्य लोकांवर उपचारही केले आहेत. बनावट डॉक्टर बनण्याआधी चंदनने फळविक्रेता, इलेक्ट्रिशियन व नंतर आइस्क्रीम विक्रेता म्हणूनही व्यवसाय केले आहेत.
पाच वर्षांपासून सुरू होती फसवणूक
मागच्या पाच वर्षांपासून ओम नारायणा बहुउद्देशीय या नावाने या भामट्याने चॅरिटेबल दवाखाना सुरू केला. या दवाखान्यात आयुर्वेदिक निसर्गोपचार केला जात होता. पोलिसांनी सांगितले की, हा बनावट डॉक्टर असून त्याच्याकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नाही. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, निसर्गोपचार करणार्या डॉक्टरांकडून काही बनावट प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. मागच्या 10-12 वर्षांपूर्वी नागपुरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी सांगितले की, देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून त्याने कोरोना रुग्णांवरही उपचार सुरू केले होते.
Nagpur Police Arrested Fake Doctor Treating For Covid Patient
महत्त्वाच्या बातम्या
- बदायूंतील काझीच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली, प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
- RTI : मुख्यमंत्री बनल्यापासून केजरीवालांनी एकही नवे हॉस्पिटल काढले नाही, जाहिरातींवर मात्र 800 कोटींचा खर्च, वाचा सविस्तर…
- बंगालमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी सुवेंदु अधिकारी, निवडणुकीत ममता बॅनजींचा केला होता पराभव
- काँग्रेसचे CWC बैठकीत पराभवावर आत्ममंथन, सोनिया गांधींकडून पक्षात मोठ्या बदलांचे संकेत
- हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, नड्डांसमवेत हे नेते होते हजर