• Download App
    nagpur रंगजेब कबरीच्या समर्थकांकडून नागपुरात जाळपोळ, पोलिसांवरही दगडफेक; विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; मुख्यमंत्री + गडकरी यांचे शांततेचे आवाहन!!

    Nagpur औरंगजेब कबरीच्या समर्थकांकडून नागपुरात जाळपोळ, पोलिसांवरही दगडफेक; विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; मुख्यमंत्री + गडकरी यांचे शांततेचे आवाहन!!

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपूर मध्ये   Nagpur औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका गटाने सायंकाळी ७.३० नंतर महाल परिसरामध्ये तुफान दगडफेक करून गाड्यांची जाळपोळ केली. दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने तिथे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी परिस्थिती आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. दोन्ही गटांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गल्लीबोळात घुसलेल्या दुसऱ्या गटाच्या तरुणांनी दगड, चाकू, तलवारी, लाठ्या काठ्या फेकून पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मारल्या. त्यामध्ये साधारण 20 पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले.   Nagpur

    औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळली. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असे सांगत संतप्त झालेल्या तरुणांनी सायंकाळ नंतर दगडफेक आणि जाळपोळ केली. पण पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी गल्लीबोळांमध्ये जाऊन कोंबिंग ऑपरेशन केले. ज्या तरुणांनी दगडफेक केली, त्यांची नावे सांगा असे आवाहन केले. परंतु पोलिसांच्या आवाहनाला या गल्लीबोळांमधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करून दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या तरुणांना पकडून रस्त्यावरच ठोकून काढले. सुमारे 35 तरुणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविले.

    याच दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. मंत्री आणि सत्ताधारी आमदार भडकाऊ भाषणे करत असल्याने नागपूर पेटले असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला, त्यांना यशोमती ठाकूर आणि अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला. मात्र, बाहेरून प्लॅनिंग करून लोक आणून नागपूर मध्ये दंगल घडवण्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरची शांतता कायम ठेवली पाहिजे असे नागपूरकरांना आवाहन केले.

      Nagpur violence aurangzeb tomb clash

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल