• Download App
    Nagpur Helicopter Plant, Max Aerospace MOU

    Devendra Fadnvis : नागपुरात हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; 8 हजार कोटींची गुंतवणूक, 2 हजार रोजगार; ‘मॅक्स एअरोस्पेस’सह शासनाचा सामंजस्य करार

    Devendra Fadnvis

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Devendra Fadnvis नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षी २०२६ पर्यंत कारखाना सुरु होण्याची शक्यता आहे. ८ हजार कोटींची ही गुंतवणूक येत्या आठ वर्षात टप्प्प्याटप्याने होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.Devendra Fadnvis

    नागपुरात यापूर्वीपासून “फाल्कन’ विमानाचे सुटे भाग तयार होतात. २०२५ मध्ये नागपुरातून पहिल्या फाल्कन २००० एलएक्सएस जेटचे अनावरण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र ते आता पुढे ढकलले आहे. या सोबतच नागपुरात बोईंगचा तसेच इंडमारचा विमान देखभाल दुरुस्ती केंद्र (एमआरओ) आहे. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.



    अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून त्याचे प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

    हेलिकॉप्टर उत्पादनास समर्पित पहिला प्रकल्प

    हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन व पूर्ण उत्पादनासाठी समर्पित हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्य करणार आहे.

    Nagpur Helicopter Plant, Max Aerospace MOU

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पृथ्वीराज चव्हाणांच्या सनातनी आतंकवाद या विधानावरुन प्रकाश महाजनांनी त्यांना सुनावले; शिंदे सेनाही आक्रमक

    मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाउन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!

    राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेकाप ठाकरे बंधूंच्या दारी; संभाजी ब्रिगेडची दोरी पवारांच्या हाती!!