• Download App
    देशभरातील विद्यापीठांमध्ये रक्तदान शिबिरांचा नाम फाऊंडेशनचा संकल्प; आरोग्यमंत्र्यांशी चर्चा सुरू; नाना पाटेकरांची माहिती|NAAM foundation to conduct blood donation camps in all universities in india, says nana patekar

    देशभरातील विद्यापीठांमध्ये रक्तदान शिबिरांचा नाम फाऊंडेशनचा संकल्प; आरोग्यमंत्र्यांशी चर्चा सुरू; नाना पाटेकरांची माहिती

    प्रतिनिधी

    पुणे : वाढत्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभर रक्ताचा तुटवडा जाणवत असताना नाम फाऊंडेशन आता देशभरात सर्व विद्यापीठात रक्तदान शिबिरांचे आयोजन करणार आहे. त्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती नाम फाऊंडेशनचे प्रमुख अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.NAAM foundation to conduct blood donation camps in all universities in india, says nana patekar

    नाम अर्थान नाना पाटेकर – मकरंद अनासपुरे यांचे फाऊंडेशन आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या विद्यमाने देशव्यापी रक्तदान उपक्रमाचा एक भाग म्हणून आज पुण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते.



    ते म्हणाले, की तरूणांनी रक्तदान शिबिराला प्रतिसाद दिला. ही चांगली गोष्ट असून यात तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला आहे. अधिकाधिक तरुणांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे.

    आजच्या तरुण पिढीला सांगितले, तर ते लगेच ऐकतात, पण दुसर्‍या बाजूला काही मंडळी त्यांना दूषणे देत असतात. या पिढीला काही कळत नाही. ते कसेही वागतात. माझे अशा व्यक्तींच्याविरुद्ध मत आहे. खरेतर आजच्या एवढी तरुण पिढी कोणतीच सजग नव्हती,” अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    NAAM foundation to conduct blood donation camps in all universities in india, says nana patekar

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!