विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकच्या विजयाने भरले उत्साहाचे वारे तरी महाविकास आघाडी सावध पवित्रे!!, अशीच आजच्या सिल्वर ओक मधल्या बैठकीत अवस्था होती. कर्नाटकच्या विजयामुळे उत्साहात आलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीचे बैठक जरूर घेतली. पण त्यामध्ये फक्त वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करण्यावरच भर देणारी चर्चा झाली. त्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप या विषयाला मात्र नुसता स्पर्श करून तो विषय सोडून देण्यात आला. MVA leaders only discussed vajramooth sabha but avoided discussion on seat sharing in maharashtra
या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार, भाई जगताप, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत हे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेऊन महाविकास आघाडीच्या प्रसंगी इनडोअर वज्रमुठ सभा घेण्याचाही निर्णय झाला. त्यापैकी पहिली वज्रमूठ सभा पुण्यात घेऊन त्या सभेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचे ही नियोजन झाले. अर्थातच या सभेचे नियोजन खर्च आणि जबाबदारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस वर आहे. पण प्रत्यक्षात तिथे काँग्रेसच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्कार होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नियोजनाखाली पुण्यात काँग्रेस नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
पण हे झाले फक्त वज्रमूठ सभेचे. त्यापलीकडे जाऊन महाविकास आघाडीत महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागा यामध्ये वाटप करण्यासंदर्भात गंभीर चर्चा आज झालीच नाही. उलट ती टाळण्याकडे सर्व नेत्यांचा कल दिसला. मात्र, आमच्या आघाडीचे जागावाटप सौहार्दपूर्ण वातावरणात होईल, असे आश्वासन संजय राऊत यांनी नंतरच्या पत्रकार परिषदेत दिले. त्यापलीकडे जागावाटप हा सर्वात कळीचा मुद्दा चर्चेत आणि नंतरच्या पत्रकार परिषदेतही आला नाही. त्यामुळे कर्नाटकच्या विजयाने नुसते भरले उत्साहाचे वारे प्रत्यक्षात जागा वाटपाचे कुणाचेच ठरेना रे!!, अशी अवस्था आली.
MVA leaders only discussed vajramooth sabha but avoided discussion on seat sharing in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??