विशेष प्रतिनिधी
मुंबई : थोरला भाऊ – धाकटा भाऊ वादात महाविकास आघाडी अखेरीस बचावात्मक पवित्र्यात आली आहे. आपापसातल्या जागांमध्ये आत्ता वाद नको, आधी भाजपच्या वाट्याच्या 25 जागा आपापसात वाटून घेऊ या. त्याची चर्चा आधी करू या, असा निष्कर्ष महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी काढला आहे. MVA leaders are in defensive mode over seats sharing in maharashtra
महाविकास आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या थोरला आणि धाकटा भाऊ यावर वाद सुरू झाला असताना जागा वाटपाच्या खडकावर आघाडी फुटण्याची चिन्हे निर्माण झाल्यावर आघाडीतल्या नेत्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या 23 जागा आणि संभाजीनगरची एमआयएमने जिंकलेली जागा तसेच अमरावतीची अपक्ष जागा अशा 25 जागा आपापसांत वाटून घेण्यावर आपण आधी चर्चा करू आणि मग आपल्या जागांवर बोलू, असे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरविल्याची बातमी आहे.
अजितदादा पवारांनी महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी थोरल्या भाऊ आहे असे सांगितल्यानंतर नाना पटोल आणि संजय राऊत यांनी अजितदादांच्या वक्तव्याला छेद देणारी वक्तव्य केली. काँग्रेसने मेरिट वर जागावाटप करू, असा नवा फॉर्मुला पुढे आणला.
शिवसेनेने आमच्या 19 जागा सोडून बोला असे स्पष्ट सांगितले. पण आपापसातला हा वाद अधिक टोकाला घेऊन जाण्यापेक्षा 48 पैकी भाजपने ज्या 25 जागा जिंकल्या त्या वाटून घेऊन मग इतर जागांवर चर्चा करू, असा बचावात्मक पवित्रा तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अर्थात या बातम्यांना महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही.
MVA leaders are in defensive mode over seats sharing in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची चिन्ह; TMC-CPI ने केली घोषणा
- पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत वक्तव्यावरून केजरीवालांच्या अडचणी वाढल्या, गुजरात कोर्टाने जारी केले समन्स
- राहुल गांधींनी नवीन पासपोर्टसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा, एनओसी देण्याची केली विनंती
- सावरकर पोर्ट्रेट ते सावरकर जयंती दिनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन; लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या विरोधकांच्या बहिष्काराचा असहिष्णू पायंडा!!