• Download App
    महाराष्ट्रातले सरकार काँग्रेसच्या जीवावर!!; भाई जगताप यांनी शिवसेना - राष्ट्रवादीला सुनावले!!; 28 डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत|MVA government in Maharashtra is supported by congress, don't forget, tells Bhai Jagtap

    महाराष्ट्रातले सरकार काँग्रेसच्या जीवावर!!; भाई जगताप यांनी शिवसेना – राष्ट्रवादीला सुनावले!!; २८ डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या जीवावर चालले आहे, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांना सुनावले आहे. येत्या 28 डिसेंबरला राहुल गांधी यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. त्या सभेला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.MVA government in Maharashtra is supported by congress, don’t forget, tells Bhai Jagtap

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे राजकीय अस्तित्व पुसून टाकल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. यातूनच भाई जगताप यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला काँग्रेसच्या जीवावर तुमचे सरकार चालू आहे, असे सुनावून घेतले आहे.



    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतील. शिवसेना यूपीएमध्ये प्रवेश करू शकते, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे आहे.

    त्याच वेळी भाई जगताप यांनी काँग्रेसच्या जीवावर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे सरकार चालू आहे असे सुनावून घेऊन या दोन्ही पक्षांचे काँग्रेसवरचे अवलंबित्व अधोरेखित केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अद्याप यायच्या आहेत.

    MVA government in Maharashtra is supported by congress, don’t forget, tells Bhai Jagtap

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ