• Download App
    Muslim parties clashed with each other in Malegaon Municipal Corporation over the issue of voter verification, the matter escalated to a fight!! मतदार पडताळणीच्या मुद्द्यावर दोन मुस्लिम पक्ष मालेगाव महापालिकेत एकमेकांना भिडले, प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले!!

    मतदार पडताळणीच्या मुद्द्यावर दोन मुस्लिम पक्ष मालेगाव महापालिकेत एकमेकांना भिडले, प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले!!

    Muslim parties

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची विशेष महासभा गुरुवारी रणधुमाळीत पार पडली. निवडणूक आयोगाच्या मतदारयादी पडताळणी आणि नकाशीकरण (SIR) प्रक्रियेसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात दोन मुस्लिम पक्षांचे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Muslim parties clashed with each other in Malegaon Municipal Corporation over the issue of voter verification, the matter escalated to a fight!!

    वादाचे कारण काय?

    निवडणूक आयोगाच्या बीएलओंना मदत करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे मानधन तत्त्वावर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करावेत, असा ठराव सत्ताधारी मालेगाव सेक्युलर फ्रंटने मांडला होता. या नियुक्त्या पारदर्शक असाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याला परवानगी द्यावी, असा यामागचा उद्देश होता.



    मात्र, एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज यांनी या नियुक्त्यांच्या नियमावलीवर आणि मानधनाच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपमहापौर शान ए हिंद यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान न झाल्याने वादाची ठिणगी पडली.

    सभागृहात नगरसेवकांची धक्काबुक्की

    चर्चा सुरू असतानाच वाद विकोपाला गेला आणि महापौरांच्या आसनासमोरच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक समोरासमोर आले. इस्लाम पार्टीचे नगरसेवक करण चव्हाण आणि एमआयएमचे नगरसेवक हनीफ शेख यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि दोन्ही गटाचे नगरसेवक आपापसात भिडले. अखेर शिवसेनेच्या नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद शांत झाला. मात्र, या गोंधळाचा निषेध करत एमआयएमच्या नगरसेवकांनी महासभेतून सभात्याग केला.

    गदारोळातच ठराव मंजूर

    विरोधी पक्षाचा विरोध आणि सभात्याग सुरू असतानाच, सत्ताधारी गटाने प्रचंड गदारोळात हा ठराव मंजूर केला. महापौर नसरीन शेख यांनी या विषयाला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. हा मंजूर झालेला ठराव आता अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या महासभेला आयुक्त रवींद्र जाधव आणि नगरसचिव साजिद अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या गोंधळामुळे महासभेचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. मालेगाव महापालिकेत यापूर्वीही इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये खटके उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. आजच्या या प्रकारामुळे महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. या चर्चेत नरेंद्र सोनवणे, निलेश आहेर, इरफान अली आणि मुस्तकीम डिग्निटी यांसह अनेक नगरसेवक सहभागी झाले होते.

    Muslim parties clashed with each other in Malegaon Municipal Corporation over the issue of voter verification, the matter escalated to a fight!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भोंदू बाबा अशोक खरातची बायको फरारी; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

    प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या समर्थनात पार्थ पवारचे पहिल्यांदाच ट्विट; रोहित पवार सह पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना धक्का!!

    अख्खी राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये काढून भाजपमध्ये येऊन कर्तृत्व गाजविणाऱ्या नेत्याला राहुल गांधींकडून सर्वांत “भ्रष्ट” मुख्यमंत्र्याचे “सर्टिफिकेट”!!