• Download App
    अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळताना हत्या, अजित पवार संतापले; हत्येची तीव्र शब्दात निंदा । Murder of a minor girl student while playing kabaddi, Ajit Pawar angry; Condemnation of murder in strong words

    अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळताना हत्या, अजित पवार संतापले; हत्येची तीव्र शब्दात निंदा

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिची कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले असून या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे म्हंटले आहे. Murder of a minor girl student while playing kabaddi, Ajit Pawar angry; Condemnation of murder in strong words

    “पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणे हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.



    तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल,” असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. “यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात अजित पवार यांनी कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

    पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांनी दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना पुढे म्हटलं की, “अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्याचे कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”.

    Murder of a minor girl student while playing kabaddi, Ajit Pawar angry; Condemnation of murder in strong words

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा