• Download App
    Parth Pawar Mundhwa Land Scam Documents Power Attorney Photos VIDEOS Report मुंढवा भूखंड घोटाळ्यात ट्विस्ट; पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज

    Mundhwa Land Scam : मुंढवा भूखंड घोटाळ्यात ट्विस्ट; पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज

    Mundhwa Land Scam

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Mundhwa Land Scam उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.Mundhwa Land Scam

    अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचे दस्तऐवज उघड केले. प्रस्तुत दस्तऐवज या प्रकणातील एक संशयित दिग्विजय पाटील व शितल तेजवानी यांचे वकील तृप्ता ठाकूर यांनीच मिळवले आहेत. त्यांनी ती दमानिया यांना दिले आहेत.Mundhwa Land Scam



    प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वारंवार समोर येत आहे. पण त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नाही. उलट दिग्विजय पाटील व शितल तेजवानी यांनाच सातत्याने चौकशी व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तृप्ता ठाकूर यांनी पार्थ पवारांविरोधातील दस्तऐवज समोर आणली आहेत, असे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.

    सर्व माहिती व दस्तऐवज पोलिसांकडे, पण कारवाई नाही – कुंभार

    विजय कुंभार यांनी यावेळी हे सर्व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध असल्याचाही दावा केला. शितल तेजवानी यांनी 2021 मध्ये पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे सर्व व्यवहारांचे अधिकार दिले होते. या संदर्भातील सर्व माहिती व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध आहेत. पण त्यानंतरही या प्रकरणी पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे संशय बळावत आहे, असे ते म्हणालेत.

    मुख्यमंत्री, महसूल मंत्र्याचे पवारांना अभय

    अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवारांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे. पण पार्थ पवारांनी तेव्हा हे पत्र आपल्या स्वाक्षरीचे नसल्याचा दावा केला होता. 25 मे 2021 रोजी हा व्यवहार करून देण्यात आला. हे सर्व दस्तऐवज सरकार दरबारी जमा आहेत. मागील 5-6 वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. अजित पवारांना हे सर्वकाही माहिती होते. मुख्यमंत्री व महसूल मंत्री या प्रकरणात त्यांना प्रोटेक्ट करत आहेत.

    प्रत्येक पानावर पार्थ पवारांची स्वाक्षरी

    मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल व्हावा. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. या पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवारांची प्रत्येक पानावर स्वाक्षरी आहे. त्यांचा फोटोही त्यावर आहे. यात उभयंतांत झालेले व्हॉट्सएप चॅटही आहे. संतोष हिंगणे व तृप्ता ठाकूर यांच्याही चॅटचा यात समावेश आहे.

    अजित पवारांचे पीए संतोष हिंगणे राम चौबे व वकील तृप्ता ठाकूर यांचेही यात चॅटिंग आहे. त्यानंतरही पार्थ पवारांना प्रोटेक्ट केले जात आहे. अजित पवारांचाही या प्रकरणी राजीनामा घेतला गेला पाहिजे. हा शितल तेजवानी व पार्थ पवार यांच्यात झालेला व्यवहार आहे. त्यात तीन-तीन ओएसडींचा समावेश आहे, असेही दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या.

    Parth Pawar Mundhwa Land Scam Documents Power Attorney Photos VIDEOS Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai BMC Elections : द फोकस एक्सप्लेनर : मुंबईचा ‘किंग’ कोण? महायुतीचा विजयी धडाका विरुद्ध ठाकरेंची अस्तित्वाची लढाई! कुठे कुणाचे पारडे जड? वाचा सविस्तर

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; सदनिका प्रकरणात 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीवरचे संकट टळले

    Sanjay Raut : मुंबईत ‘मविआ’ची मोर्चेबांधणी; संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन; ठाकरे-राज युतीही अंतिम टप्प्यात