• Download App
    Navnath Ban महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,'देवा'भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Navnath Ban

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देवाभाऊ हे तुमच्यासारखे घरात बसणारे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना महाराष्ट्राला नंबर एकवर न्यायचे आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते साधे मंत्रालयात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. देवाभाऊ हे जनतेत सुद्धा असतात आणि दावोसला जाऊन गुंतवणूक सुद्धा आणतात हे त्यांचे काम आहे, घरात बसून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी हे काय कळणार. तुम्ही स्वत:च्या घरात तुमचा पक्ष क्र एकचा करु शकले नाही याचे भान ठेवा, असे म्हणत मुंबई मनपाचे नगरसेवक तथा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.Navnath Ban

    नवनाथ बन म्हणाले की, मुंबईचा महापौर कोण होणार हे संजय राऊत यांनी ठरवायची गरज नाही. मुंबईकरांनी ठरवले आहे की भाजपा आणि महायुतीचा महापौर होणार आहे. राऊतांनी आपल्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबई आमचा गड असे जे तुम्ही सांगत होतात तो तुमचा गड महायुतीने सर केला आहे. तुमच्या पक्षाचे नगरसेवक तुमच्याकडे राहतील का? पक्षाचे काय होईल याकडे लक्ष द्या. तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलेली आहे. उगाच दिवा स्वप्न पाहू नका. उबाठा गटाला घसरगुंडीकडे संजय राऊत यांनी नेले आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवले पाहिजे.Navnath Ban



     

    राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का?

    नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अंगवस्त्र नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे शिवसैनिक आहेत. तुम्हीच राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का हा माझा सवाल आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांची तुम्ही गुलामी करतात. तर शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले आहे तर उद्धव ठाकरे हिरव्या मतांसाठी गुलामी करण्याचा प्रयत्न करत आहे.

    पवार- काँग्रेसला धोका दिला

    नवनाथ बन म्हणाले की, बहुमत कधीच अस्थिर नसते ते कायमच एकजूट असते. अस्थिर काय असते तर ती तुमची भूमिका असते. तुम्ही ज्या पद्धतीन भूमिका बदलत आहात ते महाराष्ट्राने पाहिले आहे.बहुमत मजबूत असते. त्यामुळे आमचा झेंडा मुंबई मनपावर फडकणार आहे. तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसला धोका दिला आहे, आता तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही.

    ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकं गेली

    नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ हे भयाचे नाही तर कायद्याचे आणि विकासाचे नाव आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे. भाजपा आणि महायुती अतिशय भक्कम आहे, आमचाच महापौर मुंबई मनपामध्ये होणार आहे. देवाभाऊ हे विकासाने मुंबईला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, त्यामुळेच सर्वाधिक मनपा निवडून आणल्या. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व गहान ठेवले त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करु नये. तुमचे आमदार हे काही ईडी सीबीआयला घाबरून गेले नव्हते ते उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून निघून गेले. नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही, एकनाथ शिंदेंना देखील नाही, उलट तुमचे किती नगरसेवक तुमच्यासोबत राहतात याकडे लक्ष द्या, हा अहंकार ठेवलात तर नगरसेवकही तुम्हाला सोडून जातील.

    Mumbaikars, not Raut, decided who will be the mayor, Navnath Ban said, ‘Deva’ brother is not a sitting at home, he is a working Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    झ्युरिक मधल्या विवानचे फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ देखील केला शेअर!!

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!