विशेष प्रतिनिधी
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह आणण्यास परवानगी मिळालेली आहे. आता पांढरे सिंह आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Mumbai zoo will import white lion and jagwar
त्याचबरोबर भारतातून नामशेष झालेला चित्ताही येणार आहे. सिंह, चित्ता आणि इतर प्राण्यांसाठी प्रदर्शन गॅलरी तयार करण्यात येणार आहे.राणीच्या बागेत पेंग्विनबरोबरच इतर परदेशी प्राणी आणण्यात येणार आहेत.
त्यांच्या गॅलरीसाठी आज महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. जॅग्वार, लेसर फ्लेमिंगो, इमू, ब्लॅक जॅग्वार, मंद्रील मंकी आदी विविध परदेशी प्राणी-पक्ष्यांचा समावेश राणीच्या बागेत आहे. त्यासाठी ९० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे.
प्राण्यांना नैसर्गिक अधिवास मिळावा अशा पद्धतीने बांधकाम होणार आहे. पट्टेधारी वाघांसाठी तयार करण्यात आलेली गॅलरी राजस्थानमधील रणथंबोर अभयारण्याच्या धर्तीवर बनविण्यात आली आहे.
इतर प्राणी ज्या प्रदेशात प्रामुख्याने आढळतात त्याच पद्धतीने गॅलरी बनविण्यात येईल.राणीच्या बागेला लागून असलेल्या मोकळ्या भूखंडावर परदेशी पाहुण्यांसाठी जागाही राखून ठेवण्यात आली आहे.
कंत्राट मिळाल्यानंतर दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया गृहही बांधण्यात येणार आहे.