भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडीत आहेत. नुकतीच त्यांची घरचे जेवण मिळण्याची मागणी कोर्टाने नाकारली होती. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दांत त्यांना फटकारले होते. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तथापि, आता मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे. Mumbai Special court judge H S Satbhai transfered to Yavatmal Court, Anil Deshmukh and Many Other Politicians Cases Was Before Him
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोठडीत आहेत. नुकतीच त्यांची घरचे जेवण मिळण्याची मागणी कोर्टाने नाकारली होती. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी देशमुख यांना आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दांत त्यांना फटकारले होते. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तथापि, आता मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुका कोर्टात बदली करण्यात आली आहे.
15 नोव्हेंबरला बदली
मुंबई उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबर रोजीच न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची प्रशासकीय कारणांमुळे तातडीनं बदली करण्यात येत असल्याचा आदेश दिला. सातभाई यांची यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली आहे. सातभाई यांच्या बदलीला सुप्रीम कोर्टानेही 13 नोव्हेंबर रोजी संमती दिली होती.
न्या. सातभाई यांच्यासमोर बड्या नेत्यांच्या खटल्यांची सुनावणी
न्या. एच. एस. सातभाई यांच्या समोर राज्यातील मोठ्या नेत्यांच्या खटल्यांची सुनावणी झाली. यात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख यांच्या खटल्यांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून बदलीा आदेश मिळाल्यावर न्या. एच. एस. सातभाई हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत.
Mumbai Special court judge H S Satbhai transfered to Yavatmal Court, Anil Deshmukh and Many Other Politicians Cases Was Before Him
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली