• Download App
    32-Hour Gridlock on Mumbai-Pune Expressway: PWD's Alternate Route Plan Revealed मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील कोंडीचे नेमके कारण काय? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यायी मार्गाचा प्रस्ताव; अहवाल आला समोर

    Mumbai-Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील कोंडीचे नेमके कारण काय? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यायी मार्गाचा प्रस्ताव; अहवाल आला समोर

    Mumbai-Pune

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Mumbai-Pune  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी अखेर 32 तासानंतर सुरळीत झाली आहे. महामार्गावर असलेल्या घाटात गॅसचा कंटेनर आडवा झाल्याने या वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. एकीकडे समृद्धी महामार्ग तयार केला आणि आता शक्तिपीठ महामार्गाच्या तयारीत असलेल्या सरकारचे या कोंडीमुळे अपयश समोर आले आहे. विशेष म्हणजे या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला पर्यायी मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वीच दिला होता. परंतु, हा प्रस्ताव मंत्रालयातील बांधकाम विभागात धूळ खात पडल्याचे समोर आले आहे.Mumbai-Pune

    वाहतूक कोंडीचा अहवाल सरकारने मागवला होता. त्यानुसार अशी माहिती समोर आली आहे की, पुणे एक्सप्रेस वेवरील संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून कर्जत शिरूर महामार्ग सुचवला आहे. मात्र हा प्रस्ताव गेली दोन वर्षांपासून धूळ खात पडला आहे. सर्व घाटमाथ्यांवरील रस्त्यांमध्ये 20 ते 25 किमीचे अंतर आहे. मात्र माळशेज ते लोणावळा या घाटमाथ्यावरील रस्त्यामध्ये 70-80 किमीचे अंतर आहे. त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर कितीही बदल केला तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. तसेच कर्जत शिरूर महामार्गाचे काम करावेच लागले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.Mumbai-Pune



    कर्जत शिरूर महामार्ग करण्याचा प्रस्ताव

    मुंबई एमएमआर रिजन, जेएनपीटीच्या अवजड वाहनांना पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, हैदराबाद तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जाण्यासाठी एक्सप्रेस वे हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता याला पर्याय म्हणून कर्जत शिरूर महामार्ग करावा, असा प्रस्ताव सरकारला देण्यात आलेला आहे.

    मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी फडणवीस यांनी या परिस्थितीची सखोल चौकशी करून उपाययोजनांसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश ‘एमएसआरडीसी’ला दिले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन वाहतूक आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना देऊन ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

    32-Hour Gridlock on Mumbai-Pune Expressway: PWD’s Alternate Route Plan Revealed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करायचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय; शुभेच्छांचे होर्डिंग्ज आणि पुष्पगुच्छ पण नकोत!!

    संजय राऊतांची शरद पवारांना राज्यसभेची ऑफर म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर पाणी!!

    Vijay Pandhare : विजय पांढरे म्हणाले- प्लेन ॲक्सिडेंट अहवाल सरकारधार्जिणा असेल, कोर्टावरचाही विश्वास उडाला