• Download App
    Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती । Mumbai Police On Raj Kundra Pornography Case Said Kundra Deal for 121 video for 12 lakh USD

    Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती

    Raj Kundra Pornography Case : पोर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढच होत आहे. या प्रकरणाशी संबंधित दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता राज कुंद्रासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेची टीम शुक्रवारी जुहू येथील त्याच्या किनारा या बंगल्यावर गेली होती. शिल्पा शेट्टीही या घरात राहते. राज कुंद्राच्या Neuflicks नावाच्या नवीन अ‍ॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या 19 अॅडल्ट व्हिडिओशी संबंधित कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि एका गहाळ सर्व्हरचाही पोलीस शोध घेत आहेत. Mumbai Police On Raj Kundra Pornography Case Said Kundra Deal for 121 video for 12 lakh USD


    वृत्तसंस्था

    मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढच होत आहे. या प्रकरणाशी संबंधित दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता राज कुंद्रासंदर्भात मुंबई गुन्हे शाखेची टीम शुक्रवारी जुहू येथील त्याच्या किनारा या बंगल्यावर गेली होती. शिल्पा शेट्टीही या घरात राहते. राज कुंद्राच्या Neuflicks नावाच्या नवीन अ‍ॅप (प्लॅन बी) साठी बनविण्यात येणाऱ्या 19 अॅडल्ट व्हिडिओशी संबंधित कराराची कागदपत्रे, काही गहाळ सीडीज आणि एका गहाळ सर्व्हरचाही पोलीस शोध घेत आहेत.

    पोर्नोग्राफीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन

    पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेला बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत आता आंतरराष्ट्रीय कनेक्शन चर्चेत येत आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर त्यांना आढळले आहे की राज कुंद्रा १२ लाख डॉलर्समध्ये 121 व्हिडिओ विकण्याबाबत सांगत होता. मुंबई पोलीस म्हणाले की, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकरण असल्याचे दिसते.

     

    कुंद्राचे मुंबई उच्च न्यायालयात अपील

    यपोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून अटकेला आव्हान दिले आहे. त्याने म्हटले की, त्याची अटक बेकायदेशीर आहे. दरम्यान, अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी आणि काही अॅप्सद्वारे प्रसारित करण्याच्या खटल्यात उद्योजक राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत मुंबईच्या कोर्टाने शुक्रवारी 27 जुलैपर्यंत वाढ केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री अटक केली होती. यापूर्वी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    कोठडीचा कालावधी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी त्याच्या कोठडीत मुदतवाढ देण्याची विनंती केली. यापूर्वी पोलिसांनी कोर्टाला सांगितले होते की, 45 वर्षांचा हा व्यावसायिक अश्लील साहित्य तयार करणे आणि विक्री करण्याच्या बेकायदेशीर कृतीतून आर्थिक कमाई करत होता.

    राज कुंद्राच्या कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ

    पोलिसांनी दावा केला आहे की, त्यांनी कुंद्राचा मोबाइल फोन हस्तगत केला आहे आणि त्यातील कंटेंट तपासणे तसेच त्याच्या व्यवहाराचे डिटेल्स पाहणे आवश्यक आहे. कुंद्रा व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी एक आरोपी रायन थॉर्पे याला न्यायालयात हजर केले. कोर्टाने त्याची कोठडीही 27 जुलैपर्यंत वाढविली.

    Mumbai Police On Raj Kundra Pornography Case Said Kundra Deal for 121 video for 12 lakh USD

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!