• Download App
    फडणवीसांचे पीए असल्याचे भासवून लोकांकडून 15 लाख रुपये उकळणारे दोघे मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!! Mumbai Police arrest two people for impersonating as PAs of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and duping people to the tune of Rs 15 Lakhs.

    फडणवीसांचे पीए असल्याचे भासवून लोकांकडून 15 लाख रुपये उकळणारे दोघे मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून 15 लाख रुपये उकळणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. Mumbai Police arrest two people for impersonating as PAs of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and duping people to the tune of Rs 15 Lakhs.

    आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए आहोत. तुम्हाला त्यांच्याकडून काही काम करून हवे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगून सुहास महाडिक आणि किरण पाटील हे दोघेजण लोकांना फसवत होते. काही लोकांकडून त्यांनी 15 लाख रुपये उकळले होते. पोलिसांना या संदर्भातली माहिती समजतात त्यांनी जाळे लावून या दोघांनाही अटक केली.

    मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध केस दाखल करून त्यांची चौकशी आणि तपास सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लोकांची फसवणूक करून आपण 15 लाख रुपये उकळण्याची कबुली सुहास महाडिक आणि किरण पाटील या दोन्ही आरोपींनी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

    Mumbai Police arrest two people for impersonating as PAs of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis and duping people to the tune of Rs 15 Lakhs.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे करणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले- गुन्हेगारी वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

    CM Eknath Shinde : ‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’ सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Chhatrapati Sambhaji Nagar : टीसी घ्यायला आला आणि शिक्षकालाच भोसकले, छत्रपती संभाजीनगर हादरले! अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात