• Download App
    मुंबई महापालिका निवडणूक : एकीकडे प्रशासक नेमण्याची तयारी; दुसरीकडे 125 जागा जिंकण्याचा शिवसेनेचा दावा!! । Mumbai Municipal Corporation elections: On the one hand, the preparation to appoint an administrator; On the other hand, Shiv Sena claims to win 125 seats !!

    मुंबई महापालिका निवडणूक : एकीकडे प्रशासक नेमण्याची तयारी; दुसरीकडे 125 जागा जिंकण्याचा शिवसेनेचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर ताबडतोब तेथे प्रशासक नेमण्यास महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने मंजुरी दिली आहे, तर दुसरीकडे त्याच सरकार मधले वरिष्ठ मंत्री अनिल परब यांनी मात्र शिवसेना मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवून 125 जागा जिंकेल, असा दावा केला आहे. Mumbai Municipal Corporation elections: On the one hand, the preparation to appoint an administrator; On the other hand, Shiv Sena claims to win 125 seats !!

    मुंबई महापालिकेची मुदत 8 मार्च रोजी संपत आहे. त्यानंतर लगेच तेथे प्रशासक नेमण्याच्या हालचाली ठाकरे – पवार सरकारने चालविल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याचा हा डाव असल्याचा राजकीय वर्तुळात आरोप होत आहे.



    या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती ठरली असून 236 पैकी 150 प्रभाग जिंकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 125 प्रभाग निश्चित जिंकू, असा दावा केला आहे. महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. परंतु अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    एकीकडे मुंबईत प्रशासक नेमून महापालिकेची निवडणूक पुढे ढकलून आपल्या सोयीनुसार घेण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री 125 जागा जिंकण्याचा दावा करून शिवसैनिकांना चार्ज करण्याचा प्रयत्न करताहेत. अशी दुहेरी रणनीती शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसत आहे.

    Mumbai Municipal Corporation elections: On the one hand, the preparation to appoint an administrator; On the other hand, Shiv Sena claims to win 125 seats !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस