विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत. दोन लहान मुले आहेत तरी इतकं बिनधास्त कसं? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.Mumbai Mayor got angry on Kareena Kapoor , how come mother of two small children are so careless?
करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. करीना आणि अमृता या दोघी जीवलग मैत्रिणी असून पार्टी गर्ल्स म्हणून त्यांना ओळखले जाते. या दोघीही कोरोनाच्या सुपर स्प्रेडर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण या दोघींनीही गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. मुंबईतील पार्ट्यांमध्ये सहभागी होत असताना या दोघींनी कोविड नियमांचे उल्लंघन केले होते.
यांवर महापौर म्हणाल्या, बॉलिवूडकरांनी नियम पाळायला हवेत. तसेच राजकीय लोकांनी देखील नियमांचे पालन करायला हवे. ग्रॅन्ड हयातमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नियम मोडले जात आहेत. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा सध्या होम क्वारंटाईन आहेत. दोघींवर पालिकेचे लक्ष असणार आहे.
महानगरपालिकेने करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या संपकार्तील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल आज येऊ शकतात. दोघींच्याही प्रकृतीविषयीचे अपडेट अद्याप समोर आलेले नाहीत.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ज्यांनी विचारले कोरोना कुठे आहे त्यांनादेखील कोरोनाची लागण झाली. बॉलिवूडमधील जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने वागले पाहिजे. माझे प्रामाणिक मत आहे की, आपले मुख्यमंत्री काटेकोर नियमांचे पालन करत आहेत तर राजकीय व्यक्तींनीदेखील नियम पाळले पाहिजेत.
Mumbai Mayor got angry on Kareena Kapoor , how come mother of two small children are so careless?
महत्त्वाच्या बातम्या
- धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
- काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी
- राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!
- राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींसमोर काशीमध्ये आज प्रेझेन्टेशन
- लबाडांना रोखण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कडक नियमावली जारी
- कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका