• Download App
    मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील बीएमडब्ल्यू वर्कशॉपला भीषण आग ; ४० ते ४५ बीएमडब्ल्यू गाड्या जळून खाकMumbai: Massive fire at BMW workshop at Turbhe MIDC; Burn 40 to 45 BMW cars

    मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील बीएमडब्ल्यू वर्कशॉपला भीषण आग ; ४० ते ४५ बीएमडब्ल्यू गाड्या जळून खाक

    सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.Mumbai: Massive fire at BMW workshop at Turbhe MIDC; Burn 40 to 45 BMW cars


    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : मंगळवारी नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील डी-२०७ येथील बीएमडब्ल्यू वर्कशॉपला भीषण आग लागली. ही आग सकाळच्या सुमारास लागली होती. या आगीत ४० ते ४५ बीएमडब्ल्यू गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

    आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.



    आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आग विझवण्यासाठी तब्बल सहा तास लागले.शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.आग आटोक्यात येईपर्यंत वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. तुर्भे पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून जागेचा पंचनामा करण्यात आला आहे.

    Mumbai: Massive fire at BMW workshop at Turbhe MIDC; Burn 40 to 45 BMW cars

    Related posts

    रोहित पवारांनी तेलगू देशम पार्टीला आणि भाजपला ओढले संशयाच्या जाळ्यात; पत्रकार परिषदेतून आरोप आणि दाव्यांच्या फैरी!!

    Himanta Biswa Sarma : हिमंता म्हणाले-2014 मध्ये सोनिया मला मुख्यमंत्री बनवायला तयार होत्या; राहुल यांनी नेत्यांना फोन करून परिस्थिती बदलली

    Congress-NCP : राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा 2014चा निर्णय अखेर रद्द; 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला होता निर्णय