सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.Mumbai: Massive fire at BMW workshop at Turbhe MIDC; Burn 40 to 45 BMW cars
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : मंगळवारी नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील डी-२०७ येथील बीएमडब्ल्यू वर्कशॉपला भीषण आग लागली. ही आग सकाळच्या सुमारास लागली होती. या आगीत ४० ते ४५ बीएमडब्ल्यू गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
आगीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आग विझवण्यासाठी तब्बल सहा तास लागले.शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.आग आटोक्यात येईपर्यंत वर्कशॉपमधील ऑफिससह सर्व फर्निचर आणि कागदपत्रं जळून खाक झाली आहेत. तुर्भे पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून जागेचा पंचनामा करण्यात आला आहे.