वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना आणि ओमायक्रोनचे वाढते संकट लक्षात घेतात मुंबईसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. Mumbai, Maharashtra has no lockdown, but strict restrictions; The Chief Minister will take the final decision
मुंबईसह राज्यात लाॅकडाऊन लावणार नाही पण जनतेला नियमावली पाळावेच लागतील आणि ती नियमावली पाळण्यात कोठे कुचराई झाली तर लाॅकडाऊन लावावे लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
मुंबईत झालेल्या या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल चहल आदी नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई-पुणे या शहरांमध्ये प्रामुख्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीतले निर्णय मुख्यमंत्र्यांना कळविण्यात येतील आणि अंतिम निर्णय ते जाहीर करतील असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.